लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अडीच वर्षांच्या कोरोनाकाळात अनेक कुटुंबांना आपले सदस्य गमवावे लागले आहेत. परंतु, वर्तमान परिस्थितीमध्ये कोविडवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे सध्या कोविडमुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झाली असून, रुग्ण हे गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रोज १-२ नागरिकांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह येत आहेत. परंतु, आता मृत्यूचे चक्र मात्र थांबले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५,३४,०६७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ४६,७८८ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ४६,०५७ बाधित कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. तर ५८९ कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. आजघडीला जिल्ह्यात १६ ॲक्टिव्ह रूग्ण असून यातील एकही रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात भरती नसल्याचे दिसते.
सक्रिय रुग्ण गृहविलगीकरणातजिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आली आहे. रोज १-२ रुग्ण पॉझिटिव्ह येत असले, तरी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची गरज पडत नाही. त्यामुळे हे रुग्ण गृहविलगीकरणातच उपचार घेत आहेत. सध्या जिल्ह्यात १६ सक्रिय रुग्ण ते गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
- जिल्ह्यात अडीच वर्षांत काेरोनामुळे ५८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.- यामध्ये इतर जिल्ह्यातील रुग्णांचाही समावेश आहे. - जिल्ह्यात काही इतर जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी दाखल होते. वर्तमान स्थितीत १६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, रोज १-२ रुग्ण पॉझिटिव्ह असले, तरी त्यांची प्रकृती गंभीर नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी झाली आहे.- डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक