संजय पुराम यांचे प्रतिपादन : शहीद अवंती शाळा कोटजमुराचे स्रेहसंमेलनसालेकसा : ध्येय प्राप्तीकडे वाटचाल करायची असेल तर जीवनात चांगल्या सवयींचा अंगीकार करावा लागेल असे आवाहन आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी विद्यार्थ्यांना केले. ग्राम कोटजमूरा येथील शहीद अवंती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते विद्यार्थी व पालकांना संबोधीत करीत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार भेरसिंह नागपुरे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, पिपरिया क्षेत्राच्या जिल्हा परिषद दुर्गा तिराले, झालीया क्षेत्राचे जि.प.सदस्य विजय टेकाम, संस्थेचे उपाध्यक्ष कुवरलाल मच्छिरके, भोसा हायस्कूलचे संचालक भोला ब्राम्हणकर, महावीर अग्रवाल, दिनेश शर्मा, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष धनराज नागपुरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला माता सरस्वती, सावित्रीबाई फुले आणि विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलीत करून माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक मांडताना प्राचार्य डी.आर.माहुले यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला.याप्रसंगी राज्यस्तरावर कांस्यपदक पटकावणाऱ्या कराटे खेळाडू भूमिका मोतीराम शहारे या मुलीचा स्मृतिचिन्ह व रोख पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांच्या सुध्दा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे उपस्थित पाहुण्यांचाही संस्थेच्या वतीने माजी आमदार नागपुरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार नागपुरे, देवराव वडगाये, दुर्गा तिराले, विजय टेकाम यांनी ही समयोचित मार्गदर्शन केले. संचालन स्नेहसंमेलन प्रभारी व्ही.एम. मानकर यांनी केले. आभार व्ही.पी. ढेकवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. ममता नागपुरे, प्रा. आर.टी. भुरकुडे, प्रा.एस.जे.लिल्हारे, प्रा. मंगेश ठाकरे, प्रा. कुसुम शहारे, एस.ए. मोहारे, सी.बी. नागपुरे, एच.पी. बंसोड, चेतना सुलाखे, विलास गजभिये, लिल्हारे, जी.आर. कुराहे, एम. के. नागपुरे, बी. बी.उके, एच. बी. माहुले यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
चांगल्या सवयींचा अंगिकार करा
By admin | Published: January 18, 2016 2:07 AM