लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवाडा तालुक्यातील गावांमध्ये राबवून गावपातळीवरील शेतकºयांना शेतीविषयक तथा शेतीविषयक शासकीय योजनांची माहिती देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. २४ मे ते ७ जुनपर्यंत तालुक्यात कृषी पंधरवाड्यानिमित्त ग्रामस्तरीय शेतकरी बैठक आयोजित करण्यात आल्या आहे.तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने ग्राम निलज येथील शेतकरी बैठकीतून पंधरवाड्याची सुरुवात करुन ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवाड्याच्या उद्घाटनाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी अनिल इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिंदूराव चव्हाण,उपविभागीय कृषी अधिकारी एन.व्ही. नाईनवाड, सचिनकुमार, तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, मंडळ कृषी अधिकारी आर.जी. श्रृंगारे, मंडळ कृषी अधिकारी डी.एस. पारधी, एस.एम. खडसे, विषय विशेषज्ञ (किटकशास्त्र) आर.डी. चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होेते.यावेळी इंगळे यांनी शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजनांबाबद विस्तृत माहिती दिली. उपस्थित शेतकºयांना जमिनीची सुपिकता वाढविणे, बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक, पीक विमा योजना, एकात्मिक शेती पद्धती, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मोबाईलवर एसएमएस सेवा, गट समुहाच्या माध्यमातून शेती मालावर प्रक्रिया, मुल्यवर्धन व विषनन व्यवस्था, कीटकनाशके हाताळणी, जलयुक्त शिवार योजनामधून जलसाठ्याची क्षमता वाढविणे इत्यादी संबंधित विस्तृत माहिती शेतकºयांना देण्यात आली. कार्यक्रमाला बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.ग्राम निलजमधील प्रगतीशील शेतकरी संगीता सुरेश रहांगडाले, जगतराय बिसेन, हेमंत तुरकर यांनी शेतकºयांना देण्यात आलेल्या शेती दुप्पटीचा फायदा करुन घेण्याबाबत पूर्ण माहिती अवगत करुन घेण्याबाबत माहिती दिली. संचालन कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी व रोशन लिल्हारे यांनी केले. आभार आर.जी.श्रृंगारे यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमाला कृषी सहाय्यक दामेंद्र ठाकुर, रोशन मानारकर, सोनाली कुंदे, सुरेश रहांगडाले यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे तालुक्यातील गावामध्ये सकाळी १० वाजता व दुपारी ३ वाजता नंतर याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करुन ७ जुनपर्यंत शेतकºयांना कृषी विभागाच्या योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने शेती करण्यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधवड्याला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 9:45 PM
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवाडा तालुक्यातील गावांमध्ये राबवून गावपातळीवरील शेतकºयांना शेतीविषयक तथा शेतीविषयक शासकीय योजनांची माहिती देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. २४ मे ते ७ जुनपर्यंत तालुक्यात कृषी पंधरवाड्यानिमित्त ग्रामस्तरीय शेतकरी बैठक आयोजित करण्यात आल्या आहे.
ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : थेट शेतकऱ्यांशी संवाद