लोकमत न्यूज नेटवर्क साखरीटोला : सध्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात भात प्रकल्पाचा समावेश आहे. उन्नत शेती समृध्द शेतकरी या सन २०१७-१८ कार्यक्रमातंर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भात प्रकल्प सालेकसा तालुक्यातील कारुटोला येथे सुरु करण्यात आले आहे. सदर प्रकल्प १० हेक्टर क्षेत्रावर २५ शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ०.४० हेक्टर क्षेत्रावर भात प्रात्यक्षिके तालुका कृषी अधिकारी कार्यालय सालेकसामार्फत कृषी सहायक सुभाष नागदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला धान्य, बियाणे, पीकेव्ही, एच.एम.टी. तसेच तूर, पीकेव्ही-टीएआरईएस वाटप करण्यात आले.यात पन्नास टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यामध्ये यांत्रिक पध्दतीने भात पीक लावले जातील, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ होणे अपेक्षित आहे. विविध गटांच्या मार्फत प्रात्यक्षिके दाखविली जात असून याचा फायदा होईल, अशी माहिती सुभाष नागदेवे यांनी दिली.
उन्नत शेती-समृद्ध शेतकरी कार्यक्रमाची सुरुवात
By admin | Published: July 08, 2017 12:45 AM