लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दपूम रेल्वेच्या बिलासपूर मंडळांतर्गत कतरलिया व जामगाव स्थानकाच्या यार्डाचे आधुनिकीकरण व तिसऱ्या रेल्वे लाईन परियोजनेला जोडण्यासाठी नविनीकरणाचे काम १८ ते २७ जुलैपर्यंत करण्यात येत आहे. त्यामुळे १० दिवसापर्यंत या मार्गावरील प्रवासी गाड्यांचे परिचालन प्रभावित होणार आहे. गाडी (५८११७/५८११८) झारसुगडा-गोंदिया-झारसुगडा पॅसेंजर, झारसुगडा- बिलासपूर-झारसुगडा दरम्यान सदर १० दिवसपर्यंत रद्द राहील. या कालावधीत सदर गाडीचे परिचालन बिलासपूर-गोंदिया-बिलासपूर दरम्यान निर्धारित वेळेवर होईल. तर गाडी (५८१११/५८११२) टाटानगर-इतवारी-टाटानगर पॅसेंजर, झारसुगडा-इतवारी-झारसुगडा दरम्यान सदर कालावधीत रद्द राहील. या कालावधीत या गाडीचे परिचालन टाटानगर-झारसुगडा-टाटानगर दरम्यान निर्धारित वेळेवर होईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाद्वारे १८ त २७ जुलैपर्यंत एकूण १० दिवस गाडी (१२८३४) हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसला झारसुगडा व रायगड दरम्यान पॅसेंजर बनवून चालविण्यात येणार आहे.१५ दिवसांत १६ लाखांची वसुलीमंडळ रेल्वे व्यवस्थापक शोभना बंडोपाध्याय यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात, वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाºयांच्या सहकार्याने १ ते १५ जुलैपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात मंडळातून धावणाऱ्या २६१ प्रवासी गाड्या व मुख्य रेल्वे स्थानकात विना तिकीट अनियमित प्रवास व माल बुक न केलेल्या लगेजचे ५९०६ प्रकरणे नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून १६ लाख एक हजार ६४० रूपयांची वसुली करण्यात आली. तसेच केरकचरा पसरविणाºयांचे ३६७ प्रकरणे पकडण्यात आले. त्यांच्याकडून ३६ हजार ६५० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
१० दिवसांपर्यंत रेल्वे प्रवास प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:11 AM