लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या रायपूर मंडळांतर्गत उरकुरा-दाधापारा सेक्शन दरम्यान २९ जुलै तसेच ५, १२, १९ व २६ आॅगस्ट २०१८ रोजी (प्रत्येक रविवार) अनुक्रमे अप लाईन, मिडल लाईन व डाऊन लाईनवर बहुविभागीय आवश्यक अपग्रेडेशन कार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे दररोज काही प्रवासी गाड्यांचे परिचालन प्रभावित होणार आहे.यात अप व मिडल लाईनवर २९ जुलै तसेच ५, १२ व २६ आॅगस्ट रोजी गाडी (५८११७/५८११८) झारसुगडा-गोंदिया-झारसुगडा पॅसेंजर बिलासपूर-रायपूर-बिलासपूर दरम्यान रद्द राहील. गाडी (५८२०५) रायपूर-इतवारी पॅसेंजर प्रत्येक रविवारी रद्द राहील.त्यामुळे दुसऱ्या दिवशी प्रत्येक सोमवारी (५८२०६) इतवारी-रायपूर पॅसेंजर रद्द राहील. तर डाऊन लाईनवर करण्यात येणाºया आवश्यक कामासाठी रविवारी, १९ आॅगस्ट रोजी गाडी (५८११७/५८११८) झारसुगडा-गोंदिया-झारसुगडा पॅसेंजर बिलासपूर-रायपूर-बिलासपूर दरम्यान रद्द राहील. तसेच अप, मिडल व डाऊन लाईनवर आवश्यक कामासाठी २९ जुलै तसेच ५, १२, १९ व २६ आॅगस्ट रोजी गाडी (१८२३८) अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस रायपूर-बिलासपूर दरम्यान पॅसेंजर बनून धावेल.रेल्वे प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाद्वारे अपग्रेडेशनच्या सदर कार्यक्रमात परिवर्तनसुद्धा केले जाऊ शकते, असे कळविण्यात आले आहे.
ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास होणार प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:18 AM