शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

६६ दिवसानंतरही हाल बेहाल

By admin | Published: January 17, 2017 12:55 AM

नोटबंदीनंतर ५० दिवसांत बँक ग्राहकांच्या समस्या संपुष्टात येतील असे आश्वासन पंतप्रधानांनी देशवासीयांना दिले होते.

परिस्थिती जैसे थे : बँक आॅफ महाराष्ट्रचे ग्राहक त्रस्त सालेकसा : नोटबंदीनंतर ५० दिवसांत बँक ग्राहकांच्या समस्या संपुष्टात येतील असे आश्वासन पंतप्रधानांनी देशवासीयांना दिले होते. परंतु सालेकसा येथील बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये ग्राहकांची समस्या तीळमात्रही दूर झालेली नाही. आजही लोक सकाळी ८ वाजतापासून रांगेत उभे राहून रक्कम काढण्याची वाट बघतात. ६६ दिवस लोटूनही अनेक ग्राहकांना विनापैशानेच परत जावे लागत आहे.३० ते ४० टक्के ग्राहकांना अन्य व मोजक्या प्रमाणात रक्कम दिल्यानंतर रक्कम संपल्याचे फलक कॅश काऊंटवर लावल्या जाते. त्यामुळे ६० ते ७० टक्के ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ येत आहे. रांगेत उभे राहूनही कोणताच लाभ मिळत नाही. आदिवासी तालुका असल्याने सर्वसामान्य गरीब लोक वास्तव्यास आहेत. त्यांना वेळेवर पैसे मिळाले नाही तर त्यांचे बेहाल होते. परंतु बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये अशा लोकांचा सुध्दा विचार केला जात नाही. अशात त्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.(तालुका प्रतिनिधी) बँक ग्राहकांसह आंदोलन छेडणारसोमवार दि.१६ रोजी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे आणि जिल्हा काँग्रेस महासचिव सहषराम कोरोटे हे बँक आॅफ महाराष्ट्र सालेकसा येथे वास्तविकता जाणून घेण्यासाठी पोहोचले असता बँकेच्या बाहेर ग्राहकांची एकच गर्दी दिसून आली. अनेक ग्राहक सकाळपासून रांगेत उभे असल्याचे सांगत होते. रांगेत उभे राहून ही रक्कम मिळेल की नाही याबद्दल शाश्वती वाटत नव्हती. रांगेत उभे राहणाऱ्यामध्ये महिला व वृध्द, म्हातारेसुध्दा होते. बँकांत पुरेशा रकमेची व्यवस्था करुन दररोज सर्व ग्राहकांना हवी तेवढी रक्कम मिळण्याची सोय करावी, अन्यथा बँकेच्या ग्राहकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी दिला आहे.