लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बेमूदत साखळी उपोषणातील मागण्यांच्या अनुषंगाने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांनी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांचे २६ जूनपासून होणारे उपोषणावर चर्चा करून त्यांना ठोस आश्वासन दिले. त्या आश्वासनामुळे त्यांनी उपोषण स्थगीत केले आहे.सभेला मुख्यकार्यकारी डॉ. राजा दयानिधी, प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड, माध्यमिक शिक्षणाधिकारी कचवे, वित्त व लेखा अधिकारी अ.क.मडावी, उपशिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे उपस्थित होते. डीसीपीएसधारक शिक्षक बांधवांचा सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने मिळणार व जीपीएफ शिक्षक बांधवाच्या जिपीएफ खात्यावर जमा होणार यासंदर्भात सर्व गटशिक्षणाधिकारी यांना स्वतंत्रपणे बिल सादर करण्याचे आश्वासन दिले. २००२ नंतर चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू झालेल्या शिक्षक बांधवांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी यांनी अनुकुलता दर्शविली. मुख्यलेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव त्वरीत करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.जीपीएफ आॅनलाईन होणार आहेत. शिक्षक समितीची मागणी मुख्यलेखा व वित्त अधिकारी यांनी मंजूर केली. उच्च परीक्षा परवानगी, हिंदी, मराठी सूट, संगणक सूट मंजूर करण्याचे अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना दिले जाणार आहेत. १४ व्या वित्त आयोगातून शाळेचे वीजबिल भरण्यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घेवून मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायतकडे मंजुरीकरीता सादर करण्यास सांगितले.सडक अर्जुनीच्या जीपीएफ अपहार रकमेसंदर्भात शिक्षणाधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश मुकाअ यांनी दिले. चटोपाध्याय प्रकरणे, ४ टक्के सादील, प्रवास निधी संदर्भात संचालनालय पुणे यांना पत्रव्यवहार करण्याचे शिक्षणाधिकारी यांनी आश्वासन दिले.२ जानेवारीला नियुक्त झालेल्या कर्मचाºयांना वेतनवाढ लागू करण्याची मागणी मंजूर केली.या वेळी जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षीत, जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा सहसचिव संदिप तिडके, विनोद बडोले, एन.बि.बिसेन, पी.आर.पारधी, रोशन म्हस्करे, जी.एम.बैस, दिपक कापसे, बि.एस.केसाळे, हट्टेवार, प्रकाश शहारे, एस.सी.पारधी उपस्थित होते.
ठोस आश्वासनानंतर समितीचे साखळी उपोषण स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:39 PM
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बेमूदत साखळी उपोषणातील मागण्यांच्या अनुषंगाने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांनी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांचे २६ जूनपासून होणारे उपोषणावर चर्चा करून त्यांना ठोस आश्वासन दिले. त्या आश्वासनामुळे त्यांनी उपोषण स्थगीत केले आहे.
ठळक मुद्देजि.प. अध्यक्षाच्या दालनात सभा : सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने मिळणार