लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा देशात सर्वत्र विस्तार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याच हेतूने गुजरात येथे निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर छत्तीसगड व मध्यप्रदेशातही पक्ष विशेष लक्ष देणार असल्याचे राष्टÑवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी (दि.२३) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.गुजरात येथील निवडणुकीनंतर छत्तीसगढ येथे पक्ष सक्रीय होणार आहे. पक्ष विस्ताराच्या दृष्टीने यासर्व गोष्टी आवश्यक असतात. त्यामुळे गुजरात येथील निवडणूक राष्टÑवादी काँग्रेस लढत असल्याने त्याचा दुसरा अर्थ लावण्याची गरज नसल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकार सर्वच बाबतीत फेल ठरले आहे. मागील तीन वर्षात देशाच्या निर्यातीत ६ ते ७ लाख कोटी रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न पूर्णपणे फोल ठरले आहे. महागाई, नोटबंदी, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे जनता बेजार झाली आहे. त्यामुळे सरकारप्रती जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष वाढत आहे.सत्तेवर येण्यापूर्वी सरकारने जी आश्वासने दिली होती. त्यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. मागील तीन वर्षांच्या कालावधीत सरकारने एकही कौतुकासारखे काम केले नाही. या तीन वर्षांत कुठलाच बदल झाला नसून उलट बेरोजगारी आणि महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर सरकारच्या धोरणाने व्यापारीवर्ग देखील त्रस्त आहे. मोदी सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर येत असून त्याचे परिणाम देखील आता लोकांना जाणवू लागले आहे. एकंदरीत हे सरकार सर्वच गोष्टीत फेल ठरल्याचा आरोप ना.पटेल यांनी केला.थेट सरपंच निवडीचा निर्णय अयोग्यराज्य सरकारने सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. यामुळे ग्रामपंचायत सदस्यांवर अन्याय होईल.अडीच वर्षे सरपंचावर अविश्वास आणता येणार नसल्याने सरपंच मनमर्जीने कारभार करेल. यामुळे गावांगावामध्ये वाद निर्माण होतील. त्यामुळे थेट सरपंच निवडण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचे ना.पटेल यांनी सांगितले.दुष्काळी परिस्थिती त्वरित जाहीर करावीपावसाअभावी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील पिकांची स्थिती गंभीर आहे. ७० टक्के पिके वाया गेली आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आर्थिक संकटात आहे. सरकारने पिकांचे पंचनामे करुन जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करुन त्वरीत उपाय योजना कराव्यात.मात्र सरकार शेतकºयांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याने शेतकºयांची स्थिती बिकट आहे. राष्टÑवादी काँग्रेस हा मुद्दा लावून धरणार असून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करुन त्वरीत उपाय योजना जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.वैद्यकीय महाविद्यालयाकडे देणार लक्षयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे आणि असुविधांमुळे वैद्यकीय महाविद्यालयाची तिसºया वर्षाची मान्यता धोक्यात आली आहे. याकडे काही लोकांनी दुर्लक्ष केले आहे. मात्र मी आता याकडे लक्ष देणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.कर्जमाफीचा लाभ मिळणे कठीणसरकारने कर्जमाफी जाहीर केली मात्र त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना जाचक अटी लागू केल्या आहेत. कर्जमाफीवरुन सरकार दररोज नवीन अटी लागू करित आहे. त्यामुळे शेतकºयांना मार्चपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. सरकार केवळ शेतकºयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पटेल यांनी केला.
गुजरातनंतर छत्तीसगडकडे लक्ष देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 9:58 PM
राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा देशात सर्वत्र विस्तार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याच हेतूने गुजरात येथे निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे.
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : सरकारच्या चुकीच्या धोरणाने नाराजी वाढली