तपास कटाच्या दिशेने : पत्रपरिषदेतील माहिती बाहेर गेल्याचा संशयगोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी (दि.१३) रात्री ९.५६ वाजता अनिमेश ऊर्फ राज लक्ष्मीनारायण दुबे (२२) रा.गजानन कॉलनी व गजेंद्र रामचरण साते (२१) रा.मरारटोली यांना अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी कलमांमध्ये वाढ केली आहे. आ.अग्रवाल यांना कट रचून मारल्याचा प्रयत्न होता, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. शनिवारी (दि.९) शिव शर्मा व राहूल श्रीवास यांनी तिरोडा रोडवरील अशोका गार्डन रेस्टॉरेंट येथे अनिमेशला फोन करून बोलाविले. अनिमेश आपला मित्र गजेंद्रला घेऊन आला. त्यावेळी त्यांनी कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे ाहे. यामुळे या प्रकरणात आरोपीविरूध्द भादंविच्या कलम १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पत्रपरिषदेत काय सुरू आहे याची माहिती आरोपींपर्यंत पोहचल्याचाही पोलिसांचा संशय असून त्यासंदर्भात तपास करणे सुरू आहे. त्यामुळे माहिती पुरविणाऱ्या व्यक्तीलाही अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्या दिशेने सर्व पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया पोलीस विभाग करीत आहे. अटक झालेल्या दोन आरोपींची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली जात असल्याचे तपास अधिकारी एपीआय ताईतवाले यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
अग्रवाल यांच्यावरील हल्ला प्रकरणाच्या कलमात वाढ
By admin | Published: April 16, 2016 1:19 AM