पत्रकार भवन
देवरी येथील तालुका पत्रकार संघाच्या भवनातील ध्वजारोहण आ. सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि संघाचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, कौशल कुंभरे, माजी उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सी.डी.बिसेन, संघाचे सचिव सुरेश चन्ने, कोषाध्यक्ष सुनील चोपकर, नंदूप्रसाद शर्मा,,उपाध्यक्ष सुरेश भदाडे, सदस्य देवेंद्र सेलोकर, सुरेश साखरे, महेंद्र मेश्राम उपस्थित होते.
तालुका काँग्रेस
देवरी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आ. कोरोटे यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण आ. सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडीया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. तालुकाध्यक्ष संदीप भाटीया, जिल्हा महिला अध्यक्ष उषा शहारे, युवक काँग्रेस अध्यक्ष शकील कुरैशी, शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, सामाजिक कार्यकर्ता सीता कोरोटे, राजेश गहाणे, रोशन भाटीया, सुरेंद्र बन्सोड, जैपाल प्रधान उपस्थित होते.
शिवसेना कार्यालय
देवरी येथे शिवसेनेच्या जिल्हा महिला कार्यालयातील ध्वजारोहण नगर पंचायतच्या महिला कामगार बालिका सोनसर्वे यांच्या हस्ते आणि महिला आघाडीच्या जिल्हा संघटक करुणा कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रसंगी विधानसभा संघटक राजीक खान, शहर प्रमुख राजा भाटीया, तालुका संघटिका प्रिती उईके, तालुका उपसंघटिका प्रिती भांडारकर, शहर संघटिका निलेशा रामटेके, शिवसैनिक दीनदयाल मेश्राम, कृष्णा राखडे, निखिल चव्हाण, गणेश चंदेल,राजा गुप्ता, सलमा पठाण, सरिता आयतुलवार, सरिता साखरे उपस्थित होते.
भाजप कार्यालय
देवरी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातील ध्वजारोहण प्रितपालसिंग भाटीया यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष अनिल येरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी माजी आ. संजय पुराम, सविता पुराम, महामंत्री प्रवीण दहीकर, यादोराव पंचमवार, राजेश चांदेवार, ललन तिवारी, माया निर्वाण उपस्थित होते.
जिल्हा परिषद मकरधोकडा
ग्रामपंचायत भर्रेगाव अंतर्गत येणाऱ्या मकरधोकडा येथील जि. प. प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण उपसरपंच विनोद वरकडे यांच्या हस्ते आणि शाळा समितीचे अध्यक्ष सोमलाल भलावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी मुख्याध्यापक ब्रिजलाल मळकाम, पोलीस पाटील मनिष तुरकर, सहायक शिक्षक देवेंद्र मेश्राम, नंदलाल मळकाम, सुखदेव परतेकी, सावलराम भलावी, मोहीम तुरकर व मंगला टेकाम उपस्थित होते.