लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शेतकऱ्यांनी पीक विमा केला पाहिजे, जसे मानवाला जीवन विम्याची गरज आहे. तशीच गरज पीक विम्याची आहे. शेतातील माती परीक्षण केल्याशिवाय खताची मात्रा देवू नये, शेत पिकावर आलेल्या किड व रोगांचे योग्य निदान करुनच किटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी. शेती शास्त्र हे सर्व शास्त्रांची जननी असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.शेतकरी व क्षेत्रिय कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम देवरी येथील मंगल कार्यालयात शनिवारी घेण्यात आला. देवरी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सडक- अर्जुनी, देवरी, आमगाव व सालेकसा या ४ तालुक्यातील कृषी सेवा केंद्र, शेतकरी मित्र व कर्मचारी, अधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. माजी बालकल्याण सभापती सविता पुराम याच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, हिवरा कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्र विषतज्ज्ञ आर.डी. चव्हाण, धान संशोधन केंद्र साकोलीचे डॉ. जी.आर. शामकुवर, सालेकसाचे तालुका कृषी अधिकारी एस.व्ही.भोसले, मंडळ कृषी अधिकारी काशीनाथ मोहाळीकर, जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी बाळासाहेब गिरी, तालुका कृषी अधिकारी लखन बन्सोड, डॉ. किशोर पात्रीकर, मंडळ अधिकारी चंद्रभान आकरे उपस्थित होते.डॉ.शामकुवर यांनी, जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करुन खताची मात्रा द्यावी. ठोकळ धानापेक्षा बारीक धानाच्या प्रजातीवर किडरोगांचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देण्यास सांगितले. तोडसाम यांनी, कृषी केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांना किडरोगाचा योग्य निदान लावूनच किटकनाशकाची मात्रा द्यावी, अवाजवी किटकनाशके देवू नये असे सांगितले.पुराम यांनी, कृषी मेळाव्यांमुळे कृषी केंद्र संचालकांना, शेतकऱ्यांना व कृषी मित्रांना किड व रोगाच्या व्यवस्थापनाची माहिती मिळाल्याने किड व रोगाचे नियंत्रण करण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सानिध्यात राहून किड व रोगाची माहिती जाणून घ्यावी. शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे सांगितले.मेळाव्याला सडक-अर्जुनी, देवरी, आमगाव व सालेकसा येथील कृषी मित्र, कृषी सेवा केंद्र संचालक, महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते. संचालन बन्सोड यांनी केले. आभार जी.जी. तोडसाम यांनी मानले.
शेतीशास्त्र सर्व शास्त्रांची जननी आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 9:44 PM
शेतकऱ्यांनी पीक विमा केला पाहिजे, जसे मानवाला जीवन विम्याची गरज आहे. तशीच गरज पीक विम्याची आहे. शेतातील माती परीक्षण केल्याशिवाय खताची मात्रा देवू नये, शेत पिकावर आलेल्या किड व रोगांचे योग्य निदान करुनच किटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी. शेती शास्त्र हे सर्व शास्त्रांची जननी असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.
ठळक मुद्देराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : शेतकरी व क्षेत्रीय कर्मचारी प्रशिक्षण