प्राचार्य डॉ. अंजन नायडू, विभागप्रमुख प्रा. संजय टिमांडे, जिल्हा पर्यवेक्षक संजय जेणेकर, मुख्याध्यापक खुशाल उपवंशी आणि वर्गशिक्षक निरज नागपुरे, रेड रिबन क्लब समन्वयक डॉ. संध्या तांबेकर वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली जेएम हायस्कूल, सिव्हिल लाइन शाखा येथे बदलासाठी सक्ती, तरुण लोकांसह एड्स जागरूकता अभियान आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपस्थित मान्यवरांनी एड्स विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. एचआयव्ही संसर्गाच्या काही आठवड्यांत फ्लूसारखी लक्षणे, जसे ताप, घसा खवखवणे आणि थकवा येऊ शकतो आदी माहिती दिली. एकूण ११३ शालेय विद्यार्थी, १२४ आरआरसी सदस्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. मायक्रोबायोलॉजी व बायोटेक्नाॅलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. संजय तिमांडे, रेड रिबन क्लब समन्वयक डॉ. संध्या तांबेकर वंजारी, समुपदेशक प्रकाश बोपचे, रवी बघेल आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ तृप्ती चंद्रसेन बायपेयी यांनी सहकार्य केले.
सिव्हिल लाइन येथे एड्स जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:30 AM