अजित पवार स्वतःच्या इच्छेने, बुद्धीने बोलत नाहीत, जयंत पाटलांचा खोचक टोला; शिव स्वराज्य यात्रा तिरोड्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 12:18 AM2024-09-11T00:18:41+5:302024-09-11T00:21:55+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने शिव स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे मंगळवारी (दि.१०) जिल्ह्यातील तिरोडा येथे आगमन झाले.

Ajit Pawar does not speak of his own will, wisdom, Jayant Patal's mischievous gang; Shiv Swarajya Yatra in Tiroda | अजित पवार स्वतःच्या इच्छेने, बुद्धीने बोलत नाहीत, जयंत पाटलांचा खोचक टोला; शिव स्वराज्य यात्रा तिरोड्यात

अजित पवार स्वतःच्या इच्छेने, बुद्धीने बोलत नाहीत, जयंत पाटलांचा खोचक टोला; शिव स्वराज्य यात्रा तिरोड्यात

गोंदिया : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मी शरद पवारांना सोडून चूक केली असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार हे काय बोलतात त्यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट आहेत आणि कन्सल्टंट हे काय सांगतात त्यानुसार ते बोलत असतात. ते स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या इच्छेने ते बोलत नाही त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार बोलतात असा खोचक टोला ना. जयंत पाटील यांनी तिरोडा येथे आयोजित कार्यक्रमात लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने शिव स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे मंगळवारी (दि.१०) जिल्ह्यातील तिरोडा येथे आगमन झाले. यावेळी तिरोडा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिव स्वराज यात्रा तिरोडा येथे येणार होती. परंतु त्यापूर्वीच काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे पोस्टर फाडले होते. यावर ना. जयंत पाटील म्हणाले की निश्चितपणाने या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोठे अस्तित्व आहे. त्यामुळे येथील विरोधी लोक घाबरलेले आहेत. आमच्या पक्ष या ठिकाणी वाढतो त्यामुळे काही लोकांनी आमचे पोस्टर फाडले असतील त्यांचा मी निषेध करतो असे म्हणाले.

नागपूर पोलिसांनी योग्य तपास करावा त्यानंतर बोलू : जयंत पाटील
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने अपघात केला याविषयी बोलण्यासाठी महायुतीचे नेते टाळाटाळ करीत आहेत. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले आता याबाबतीत खराखुरा तपास पोलिसांनी करावा सर्व सीसीटीव्ही तपासावे, त्यानंतरच आम्ही योग्य वेळी बोलू असे वक्तव्य केले.

महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये १७५ जागा मिळतील
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वे मध्ये महाविकास आघाडीला १५५ जागा मिळत असा अंदाज आहे. यावर बोलताना ना. जयंत पाटील म्हणाले या जागा वाढून १७५ पर्यंत आम्हाला जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Ajit Pawar does not speak of his own will, wisdom, Jayant Patal's mischievous gang; Shiv Swarajya Yatra in Tiroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.