लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी येथील पर्यायी वनीकरणातून मोठ्या प्रमाणात अवैध सागवान वृक्षांची कटाई करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या परिसरात सागवान तस्कर सक्रीय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्ष संवर्धन केल्या जात आहे. ग्रामीण भागात अवैध वृक्ष तोडीला कायमचा आळा बसावा म्हणून वन विभागाच्या वतीने गाव पातळीवरील संयुक्त वनव्यवस्थापन समितीतर्फे गॅस कनेक्शनचे वाटप केले जात आहे. मात्र याकडे वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षतोडीला वाव मिळत असल्याचे चित्र आहे. खांबी येथील पर्यायी वनीकरणातून अवैध सागवान वृक्षांची कटाई करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र यानंतरही क्षेत्र सहाय्यक व बीटरक्षक असे काही घडलेच नसल्याचे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. वन विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे अवैध सागवान कटाई करणारे बिनधास्तपणे वावरत आहेत.क्षेत्र सहायक बोंडगावदेवी कार्यालयामार्फत येणाºया खांबी-पिंपळगाव येथे फुटाळा प्रकल्पांतर्गत पर्यायी वनीकरण २००२ मध्ये २८ हजार ६२५ सागवान रोपांची लागवड करण्यात आली. वनीकरणातील रोपांची देखभाल करण्यासाठी संयुक्त ग्राम वन व्यवस्थापन समितीच्या वतीने एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. सदर कार्यक्षेत्रातील वनकर्मचारी वन समितीला सहकार्य करीत नसल्याचे गावकऱ्यांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले. पर्यायी वनीकरणातील सागवान झाडांची जोपासना करण्यासाठी गावकरी पुढे सरसावले आहे. मात्र वनकर्मचारी पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य करीत नाही अशी गावकऱ्यांची ओरड आहे. मागील काही दिवसांपूर्वी या परिसरातील ९ सागवानाची झाडे आरीने कापून नेण्यात आली. त्यानंतर पुन्हा गुरूवारी (दि.१०) मोठ्या आकाराची सागवानाची तीन झाडे कटाई करुन नेल्याची घटना उघडकीस आली. शासनस्तरावर वृक्ष वाढीसाठी प्रयत्न होत असताना खांबी येथील पर्यायी वनीकरणातून सर्रासपणे सागवानाची अवैध कटाई केली जात आहे. अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने वारंवार सागवानाची अवैध कटाई करण्याच्या घटना घडत असल्याचे बोलल्या जाते. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी याप्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.वनमंत्र्याकडे करणार तक्रारखांबी परिसरातील पर्यायी वनीकरणाच्या परिसरात सागवान वृक्षांची अवैध कटाई केली जात आहे. वांरवार हा प्रकार घडत असताना याकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने वन संपत्तीचे नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.मोहिमेला हरताळपर्यावरणाचा ढासळता समतोल साधण्यासाठी राज्य शासन शतकोटी वृक्ष लागवडी सारख्या योजना राबवित आहे. जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन करीत आहे. मात्र दुसरीकडे वनविभागाच्या कर्मचाºयांचे वनांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याने वनसंपत्तीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाच्या मोहीमेला या विभागाचे कर्मचारी हरताळ फासत असल्याचे चित्र आहे.
पर्यायी वनीकरणात अवैध सागवान कटाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 1:06 AM
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी येथील पर्यायी वनीकरणातून मोठ्या प्रमाणात अवैध सागवान वृक्षांची कटाई करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या परिसरात सागवान तस्कर सक्रीय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठळक मुद्देवनविभाग सुस्त : सागवान तस्करीची शक्यता