लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शिक्षणासोबत विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सुप्तगुण व कला प्रदर्शित होतात. त्यामुळे स्रेहसंमेलनातूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो, असे मत माजी आमदार केशव मानकर यांनी व्यक्त केले.तालुक्यातील ग्राम चोपा येथील रवींद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन डॉ.नामदेव किरसान यांच्या हस्ते करण्यात आले. वक्ते म्हणून एडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिसेस पदवी कॉलेज (नागपूर) येथील प्राचार्य धमेंद्र तुरकर तर पाहुणे म्हणून म्हणून भवभूती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश असाटी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, पं.स. सभापती दिलीप चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, सरपंच कुसन भगत, माजी प्राचार्य डी.आर. कटरे, काशीराम हुकरे, वाय.डी. चौरागडे, प्राचार्य आर.आर. डे, पर्यवेक्षक एच.बी. राऊत, प्रा.डी.डी. लोखंडे, स्रेहसंमेलन प्रभारी एल.बी. मेश्राम, एस.जी. पटले, विद्यार्थी प्रतिनिधी सारंग गोळंगे, टिष्ट्वंकल पारधी, उर्वशी बिसेन उपस्थित होते.पुढे बोलताना मानकर यांनी, भवभूती शिक्षण संस्थेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी आदर्श घेवून समाजात उत्कृष्ट कार्य करणारा बनावा. उच्च शिक्षित होऊन स्वपालनासह सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.डॉ. किरसान यांनी, विद्यार्थ्यांना शिस्त व अभ्यासू प्रवृत्तीबाबत मार्गदर्शन केले. भाजपा जिल्हाध्यक्ष पटले यांनी, गुरुजींच्या शिक्षण व्यवस्थेची व ग्रामीण मुलांना सुसंस्कृत करण्यासाठीच संस्थेची स्थापना केली व या संस्थेत आजही संस्कृती टिकून आहे, असे सांगितले.या वेळी प्राचार्य तुरकर यांनी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी स्रेहसंमेलन हे मोठे दालन आहे. यातून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्र, नाट्यक्षेत्र, अभिनेता, नेता बनण्याची संधी मिळते, असे मत व्यक्त केले. रविंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा, सामाजिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा यातून विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत जातात, याची माहिती प्राचार्य रंजितकुमार डे यांनी प्रास्ताविकातून दिली.या वेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, स्काऊट गाईड सह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संचालन प्रा. डी.एस. खोटेले यांनी केले. आभार एल.बी. मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
संमेलनातूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:15 AM
शिक्षणासोबत विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सुप्तगुण व कला प्रदर्शित होतात. त्यामुळे स्रेहसंमेलनातूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो, असे मत माजी आमदार केशव मानकर यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देकेशव मानकर : चोपा येथील रवींद्र विद्यालयाचा वार्षिकोत्सव