अर्जुनी मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी भ्रमणध्वनीवरून येथील कोरोना समिती अध्यक्ष तथा सरपंच अनिरुद्ध शहारे यांना १ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान आठवडी बाजार बंद ठेवावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार ३१ मार्चला स्थानिक कोरोना समितीने बैठक घेतली होती. त्यानुसार दर गुरुवारी भरणारा आठवडी बाजार बंद करण्याचा तसेच गावातील सर्व दुकाने, व्यापारी प्रतिष्ठान गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी शासकीय कार्यालय, औषधी दुकाने, दवाखाने या अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होत्या. दर आठवड्याला भरणारा आठवडी बाजारदेखील पूर्णतः बंद होता. त्यामुळे रस्त्यावर देखील सर्वत्र शुकशुकाट होता. या कडकडीत बंदला गावातील व्यापारी बांधव, ग्रामस्थ, बाहेरगावचे दुकानदार, व्यापारी यांनी बंदला सहकार्य केल्याबद्दल सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, ग्रामविकास अधिकारी परशुराम चव्हाण, तलाठी पुंडलिक कुंभरे यांनी आभार मानले.
नवेगावबांध येथे आठवडी बाजारासह सर्व दुकाने बंद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:30 AM