आमगाव : तालुक्यातील दहेगाव येथील स्वस्त धान्य वितरक हा शासनाकडून लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या धान्यापैकी फक्त अर्धे धान्य वाटप करीत असल्याची तक्रार काही गावकऱ्यांनी केली. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीत दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी म्हैसुलीचे सामाजिक कार्यकर्ते ईश्वर कोल्हारे यांनी केली आहे.
आमगाव तालुक्यातील दहेगाव ग्रा.पं.मधील ४६ लोकांना २०२०-२१ या वित्तीय वर्षात शौचालय बांधकाम करण्याचे ग्रा.पं.ने सांगितले होते. त्यानुसार येथील लोकांनी शौचालय बांधकाम पूर्ण केले. बांधकाम पूर्ण करणाऱ्या ४६ लाभार्थ्यांपैकी २३ लाभार्थ्यांची नावे यादीत आहेत. परंतु उर्वरित २३ लाभार्थ्यांची नावे यादीत नाहीत. शासनाकडून ४६ लाभार्थ्यांचा निधी ग्रा.पं.ला मिळाला आहे. त्यापैकी फक्त २३ लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात आला. यामध्ये उर्वरित २३ लाभार्थ्यांना यादीत नाव नाही म्हणून टाळाटाळ करीत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सुध्दा योग्य माहिती न दिल्याचा आरोप कोल्हारे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कोल्हारे यांनी केली आहे.