लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नाबार्ड आणि शासनाच्या निदेर्शानुसार एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला सुरूवात झाली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक असून जिल्हा बँकेने ३४ टक्के तर राष्ट्रीयकृत बँकानी केवळ २.४९ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पीक कर्ज वाटपाप्रती राष्ट्रीयकृत बँका उदासीन असल्याचे चित्र आहे.मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना सुध्दा बसला. बऱ्याच शेतकऱ्यांना वेळीच शेतमालाची विक्री न करता आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाला आणि फळबागधारक शेतकऱ्यांची स्थिती फार बिकट झाली. शेतात उत्पादित केलेला शेतमाल शेतात सडल्याने त्यांनी केलेला लागवड खर्चसुध्दा भरुन निघालेला नाही. अशात आता खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतीची मशागत व खते आणि बियाणांची जुळवाजुळव करण्याच्या कामात शेतकरी गुंतला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक समस्या भेडसावू नये यासाठी त्यांना बँकाच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. यंदा नाबार्डने जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकाना खरीपासाठी एकूण २७० कोटी तर रब्बी हंगामाकरीता ३० कोटी असे एकूण ३०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. एप्रिल महिन्यापासून खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपास सुरूवात झाली असून आत्तापर्यंत १९.८९ टक्के पीक कजार्चे १० हजार ४३ शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. यात सर्वाधिक ४६ कोटी ७० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी ३२७ शेतकऱ्यांना २ कोटी ६२ लाख रुपये आणि ग्रामीण बँकानी ६०९ शेतकऱ्यांना ४ कोटी ३८ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले. खरीप हंगाम महिनाभर असून राष्ट्रीयकृत बँकाकडून पीक कर्ज वाटपाची गती पाहता बरेच शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.राष्ट्रीयकृत बँकाची प्रक्रिया किचकटजिल्हा बँकेपेक्षा राष्ट्रीयकृत बँकेतून पीक कर्ज उचलण्याची प्रक्रिया ही किचकट आहे. त्यामुळे शेतकरी राष्ट्रीयकृत बँकामधून पीक कजार्ची उचल करण्यास उत्सुक नसतात. हे देखील पीक कर्जाचे वाटप कमी होण्यामागील कारण आहे.
राष्ट्रीयकृत बँकाकडून केवळ अडीच टक्के पीक कर्जाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 7:34 PM
नाबार्ड आणि शासनाच्या निदेर्शानुसार एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला सुरूवात झाली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक असून जिल्हा बँकेने ३४ टक्के तर राष्ट्रीयकृत बँकानी केवळ २.४९ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.
ठळक मुद्दे जिल्हा बँकेची आघाडी कायम२७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट