लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. दिवाळी म्हणजे एक नव पर्व. घरामध्ये सर्वत्र आनंदी आनंद वातावरण. त्यातही बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही. नव्या क्षितीजाप्रमाणे घरात नवचैतन्य उजळून येते.फटाक्याची आतषबाजी, नव्या कपड्याची नवलाई, गोड गोड धोड पंचपक्वान्न खाण्याची इच्छा असते. मात्र हे सर्व केवळ ज्यांचे आई वडील आहेत त्याच मुलांना मिळते. परंतु आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्या अनाथ बालकांना सुद्धा या सर्व गोष्टींचा आनंद मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी पुढाकार घेवून अनाथ बालकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला.जिल्ह्यातल अर्जुनी मोरगाव तालुक्यासह अन्य ठिकाणच्या ४२ अनाथ वंचित गरीब मुलांना वेळोवेळी अन्नधान्यासह किराणा सामान, शालेय साहित्य व इतर आवश्यक वस्तुंचा पुरवठा अनाथाची माय म्हणून ओळखल्या जाणाºया प्रा. बेदरकर वेळोवेळी दानदात्यांच्या सहकार्यानी करीत असतात. ज्या वंचितांचे मायबापच दृष्ट काळाने एकाएकी हिरावून नेल्याने त्या कुटुंबावर मोठा आघात होऊन जन्मदात्याविना त्या मुलांची वाताहात होते. दु:ख सावरता येत नाही. दिवाळीच्या दिवशी नवीन कपडे, फटाके, मिठाई कोण देणार असे नानाविध प्रश्न निर्माण होतात. ईतर मुलांप्रमाणे अनाथ मुलांची दिवाळी आनंदाची जावी, त्यांच्यात नवचैतन्य निर्माण व्हावे या हेतूने गोंदिया शहरातील विविध दानशुरांच्या मदतीने बेदरकर मागील काही वर्षापासून आपल्याच निवासस्थानी जिल्ह्यातील अनाथ मुलांचा दिवाळी मनोमिलनाचा एक अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे. नुकताच हा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी पार पडला. या वेळी अनाथ बालकांना नवीन कपडे, मिठाई व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. अनाथ मुलांचे दिवाळी मनोमिलन या अभूतपूर्व सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी माजी जि.प. उपाध्यक्ष तथा मांडोदेवी देवस्थानचे सचिव विनोद अग्रवाल, जि.प.माजी सभापती आरती चवारे, समाजशिल शिक्षक अनिल मेश्राम, सृजन सामाजिक संस्थेचे विजय ठवरे, वशिष्ठ खोब्रागडे, वरुण खंगार, प्रणाली ठवरे, पूजा खंगार, त्रिशा खंगार, सुनिता खोब्रागडे, देवानंद भांडारकर, पंकज दियेवार, निखील खंगार, प्रमोद गुडधे उपस्थित होते. या कौटुंबिक मनोमिलन कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकर अमरचंद ठवरे यांनी केले.कपडे, मिठाई, अल्पोपहाराचे वाटपजिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ४२ अनाथ, वंचित, गरीब मुला-मुलींच्या चंद्रमोळी झोपडीत सुख-शांती आनंदाचा झरा पाझरावा यासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या अनाथ बालकांना नवीन कपडे, स्वेटर, ब्लेंकेट, शालेय साहित्य, दिवाळीचा गोड फराळ व रोख रक्कम देण्यात आली. सुखी आयुष्याबद्दल मनोकामना देवून आशीर्वाद देण्यात आले.दानशूर आले पुढेजिल्ह्यातील ४२ अनाथ मुलांना दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी गोंदियातील अनेक दानशुर पुढे आले. डॉ. राजेंद्र जैन, डॉ. निमगडे, सई अभिमन्यू काळे, अजय कोठेवार, विनोद अग्रवाल, आरती चवारे, सुनील केलनका, डॉ. नामदेव किरसान, भरत क्षत्रीय, सोंटू जैन, सुनील तरोणे, अजय जायस्वाल, रामअवतार अग्रवाल, चाईथराम गोपलानी, यशोदा सोनवाने, नानक बिसेन, शारदा सोनसावरे, मिना डुंबरे, वुमेन्स विंग, वरुण खंगार, वशिष्ट खोब्रागडे, पशिने, सुनंदा बिसेन, निरज वाधवानी, राकेश आहुजा, मधू बन्सोड, सीमा डोये, लता बाजपेयी, डॉ. सचिन चौधरी, डॉ.गोपाल हलमारे, डॉ.शंकर बनोटे, डॉ.छाया लंजे, दिनेश अग्रवाल, गुलशन बिसेन, डायट संस्थेचे राजकुमार हिवाडे, टी.जी. तुरकर, डॉ. दिशा गेडाम, पौर्णिमा मिश्रा, कनक सोनकवरे, वरुण खंगार, पुजा खंगार, विजय बहेकार, अॅड. भौतिक, पंकज दियेवार, नितेश नागपुरे यांच्यासह विविध मान्यवरांचा समावेश होता.
आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्यांना कपड्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 9:18 PM
वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. दिवाळी म्हणजे एक नव पर्व. घरामध्ये सर्वत्र आनंदी आनंद वातावरण. त्यातही बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही.
ठळक मुद्देसविता बेदरकर यांचा पुढाकार : अनाथ मुलांसह दिवाळी स्रेहमिलन कार्यक्रम