देवरी : आज आपल्या गावाला फार मोठे महत्व आहे. गावची विकासकामे करायची असेल तर विकास कामांबद्दल माहिती तुमच्या सरपंच व उपसरपंचांना भेटूनच घेता येईल. मी गावच्या विकास कार्यात सदैव तुमच्या सोबत आहे, असे प्रतिपादन आमगाव-देवरी विानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
येथे बुधवारी (दि. १७) त्यांच्या निवासस्थानी आयोजित विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त सरपंच व उपसरपंचांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, प्रदेश प्रतिनिधी राजेश नंदागवळी, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, माजी जि.प. सदस्य लता दोनोडे, तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, सालेकसा तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, आमगाव तालुकाध्यक्ष संतोष बहेकार, महेश उके, सामाजिक कार्यकर्ता सीमा कोरोटे, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, कुलदीप गुप्ता, बबलू कुरैशी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, देवरी तालुक्यातील २१, आमगाव तालुक्यातील ४ आणि सालेकसा तालुक्यातील ५ अशा एकूण ३० ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुगच्छ देऊन आमदार कोरोटे व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भाटीया यांनी मांडले. संचालन सचिन मेळे यांनी केले. आभार नरेश राऊत यांनी मानले.