लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अनेक वर्षापासून रखडलेल्या आंबेनाला तलावाच्या मंजुरीकरिता प्रत्यक्ष पाहणीसाठी राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाचे सचिव श्रीकांत कामडी दाखल झाले. आमदार विजय रहांगडाले तसेच वनविभागाच्या नागपूर व भोपाळ येथील अधिकाऱ्यांसोबत पाहणी करुन ते तसा अहवाल २५ दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीकरिता ठेवणार आहेत. त्यामुळे निमगाव येथील आंबेनाला प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असल्याचे दिसत आहे.आंबेनाला प्रकल्प १९७२ पासून ते २००६ पर्यंत रखडलेला होता. याकरिता अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. भंडारा, नागपूर व भोपाळपर्यंत पत्र व्यवहार ही झाला होता. दरम्यान, सन २०१५ मध्ये आमदार विजय रहांगडाले यांना टप्याटप्याने मंजुरीसाठी कागदपत्र जुळवाजुळव करण्याबाबत शासनाने पाठपुरावा केला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून वेळोवेळी कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाद्वारे वनविभागाला प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमिनीचा ३१ कोटींचा एफआरए निधी राज्यमंत्री मंडळाद्वारे केंद्र शासनास भरणा करण्यात आला. वनविभागाची जमीन व झाडांची किंमत यांचा समावेश करण्यात आल्यानंतरच राज्य शासनाने केंद्र शासनास प्रस्ताव सादर केला.हा प्रकल्प नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असल्यामुळे १० किलोमिटर अंतरातील प्रकल्पास वन्यजीव मंडळाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामध्ये केंद्रीय वन्यजीव मंडळाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरीकरिता चित्रफितीसह संपूर्ण अहवाल सादर करण्यासाठी प्रत्यक्ष राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाचे सचिव कामडी यांनी आंबेनालाची पाहणी केली. प्रकल्पाचे कार्य ६० टक्के पूर्ण झाले असून तलावाच्या सुरक्षा भिंतीला पिचिंग, वेस्ट वेअर, कालवा निर्मिती व अन्य कार्य पूर्ण झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आ. रहांगडाले यांनी येणाऱ्या दोन दिवसांत प्रकल्पाच्या मंजुरीकरिता केंद्रीय मंत्री हर्षवर्धन व नितीन गडकरी यांची दिल्लीमध्ये भेट घेणार असल्याची माहिती दिली. यावेळी प्रकल्पाचे कार्यकारी उपअभियंता कापसे, भाजपचे माजी उपाध्यक्ष मदन पटले, सरपंच तेजेंद्र हरिणखेडे, संजय बैस, उमेश पटले, नीरज सोनेवाने, विवेक ढोरे व किशोर ठाकूर उपस्थित होते.५०० हेक्टर जमिनीचे होणार सिंचनया प्रकल्पामुळे ५०० हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. लाभक्षेत्रातील गावांची संख्या १८ राहील. एवढेच नव्हे तर हा प्रकल्प बफर झोनमध्ये असल्यामुळे शेतीच्या सिंचनाव्यतिरिक्त नागझिरा वन्यजीव अभयारण्यांतर्गत असलेल्या प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी सुटणार आहे. तसेच निमगाव तलावाचे नैसर्गिक स्वरुप बघता विदेशी पक्ष्यांकरिता नवेगावबांध तलावाचे स्वरुप प्राप्त होणार आहे.
आंबेनाला प्रकल्पाला आले अच्छे दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 9:49 PM
अनेक वर्षापासून रखडलेल्या आंबेनाला तलावाच्या मंजुरीकरिता प्रत्यक्ष पाहणीसाठी राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाचे सचिव श्रीकांत कामडी दाखल झाले. आमदार विजय रहांगडाले तसेच वनविभागाच्या नागपूर व भोपाळ येथील अधिकाऱ्यांसोबत पाहणी करुन ते तसा अहवाल २५ दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीकरिता ठेवणार आहेत.
ठळक मुद्देराष्ट्रीय वन्यजीव मंडळाने केली पाहणी : २५ दिवसात मिळणार हिरवी झेंडी