लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी मंगळवारी (दि.३०) निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेस-भाजपा युतीच्या प्रत्येकी दोन सदस्यांची वर्णी लागली. काँग्रेसकडून रमेश अंबुले व लता दोनोडे यांची तर भाजपकडून विश्वजीत डोंगरे व शैलजा सोनवाने यांची सभापतीपदी निवडून आले.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर सभापतीपदाच्या निवडणुकीत टू बाय टू चा पॅटर्न चालला.जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक १५ जानेवारीला पार पडल्यानंतर सदस्यांचे लक्ष सभापतीपदाच्या निवडणुकीकडे लागले होते. सभापतीपदाच्या निवडणुकीत सुध्दा काँग्रेस- भाजपा युतीचा पॅटर्न कायम राहणार असल्याचे आधीच निश्चित झाले होते. त्यामुळे एकूण चार सभापतीपदांपैकी दोन काँग्रेस आणि भाजपकडे जाणार होते. मंगळवारी (दि.३०) चारही सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. दुपारी २ वाजता सभापतीपदासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्यात आले. यात काँग्रेसकडून रमेश अंबुले व लता दोनोडे तर भाजपकडून विश्वजीत डोंगरे, शैलजा सोनवाने यांनी तर राष्टÑवादी काँग्रेसकडून दुर्गा तिराले, किशोर तरोणे, मनोज डोंगरे यांनी नामाकंन दाखल केले. दुपारी ४ वाजता सभापतीपदासाठी मतदान घेण्यात आले. यात विश्वजीत डोंगरे, शैलजा सोनवाने, रमेश अंबुले, लता दोनोडे यांना विजयी घोषीत करण्यात आले. विजयी उमेदवारांना ३२ मते तर पराजीत उमेदवारांना प्रत्येकी २० मते मिळाली. मताधिक्याच्या आधारावर निवडणुक निर्णय अधिकारी अनंत वालस्कर यांनी डोंगरे, सोनवाने, अंबुले, दोेनोडे यांना विजयी घोषीत केले.िविशेष म्हणजे या निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे सदस्य दीपक पवार यांनी भाजपाच्या सदस्याला मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका स्विकारली होती.काँग्रेस सदस्यांने नामाकंन भरल्याने गोंधळजि.प.सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजपाने आपले उमेदवार आधीच निश्चित केले होते. त्यानुसार काँग्रेसकडून रमेश अंबुले व लता दोनोडे तर भाजपकडून विश्वजीत डोंगरे आणि शैलजा सोनवाने यांनी नामाकंन दाखल केले. मात्र ऐनवेळी काँग्रेसच्या सदस्या सरिता कापगते यांनी नामाकंन दाखल केले. त्यामुळे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कापगते यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी नामाकंन अर्ज मागे घेतला.हारतुरे व जल्लोष करणे टाळलेजि.प.सदस्य शेखर पटले यांचे मंगळवारी (दि.३०) निधन झाले. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेस व भाजपाच्या सदस्यांनी सभागृहाबाहेर जल्लोष करणे व हारतुरे स्विकारणे टाळले. तसेच पटेल यांना श्रध्दाजंली अर्पण केली.असे होणार खातेवाटपजि.प.सभापतीपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता कुणाला कोणता विभाग मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वजीत डोंगरे यांच्याकडे समाजकल्याण, लता दोनोडे यांच्याकडे महिला बाल कल्याण तर रमेश अंबुले यांच्याकडे आरोग्य व शिक्षण आणि शैलजा सोनवाने यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन विभाग येण्याची शक्यता आहे. ७ फेब्रुवारीला त्याचे चित्र स्पष्ट होईल.संपूर्ण देशभरात भाजप विरोधात काँग्रेस असे चित्र असताना गोंदिया जिल्ह्यात मात्र नेमके या विरोधात चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस नेतेकडे एकीकडे भाजपमुक्तचा नारा देत असताना जिल्ह्यात काँग्रेसमुक्तीचे वारे वाहत असल्याचे चित्र असून ते सभापतीपदाच्या निवडणुकीवरुन स्पष्ट होते.- गंगाधर परशुरामकरजि.प.गट नेते राष्टÑवादी काँग्रेस
अंबुले, दोनोडे, डोंगरे, सोनवाने यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:01 AM
जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी मंगळवारी (दि.३०) निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेस-भाजपा युतीच्या प्रत्येकी दोन सदस्यांची वर्णी लागली. काँग्रेसकडून रमेश अंबुले व लता दोनोडे यांची तर भाजपकडून विश्वजीत डोंगरे व शैलजा सोनवाने यांची सभापतीपदी निवडून आले.
ठळक मुद्देजि.प.सभापती निवडणूक : आधीचेच समीकरण कायम