गोंदिया : निवडणुकीत एका मतानेही सत्तेचा सारीपाट विस्कटून जातो व याचा प्रत्यय निवडणुकीत कित्येकदा आला आहे. यामुळेच एका मतालाही अत्यधिक महत्त्व असून, हे एक मत नशीब उजळू शकते किंवा त्यावर बट्टा लावू शकते. हेच कारण आहे की, उमेदवारांकडून क्षेत्रातील सर्वच मतदारांचा आशीर्वाद घ्यावा लागतो. आमगाव व गोंदिया विधानसभा मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त असून, त्यात ९,८८९ महिला मतदार जास्त आहेत. ही आकडेवारी बघता आमगाव व गोंदिया विधानसभा मतदारसंघात महिलाच ‘किंगमेकर’ दिसत असून, आता लोकसभा असो वा विधानसभा दोन्ही निवडणुकांत उमेदवारांना मात्र महिला मतदारांचा आशीर्वादच तारणार आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
पुढील महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार असून, सर्वांच्या नजरा आदर्श आचारसंहितेकडे लागून आहेत, तर निवडणुकीला घेऊन शासनासोबतच जिल्हा प्रशासनसुद्धा कामाला लागले असून, जिल्ह्याची अंतिम मतदार यादी सुद्धा प्रसिद्ध झाली आहे. मतदार यादीनुसार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांना घेऊन एकूण १०,८२,२७२ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. यामध्ये ५,३७,९६९ पुरुष, तर ५,४७,२९३ महिला मतदार असून, ९,३२४ महिला मतदार जास्त असल्याचे दिसून येते. ही जिल्ह्याची आकडेवारी झाली असली तरी विधानसभा मतदारसंघनिहाय बघितल्यास तिरोडा व गोंदिया विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत जास्त आहे.
तिरोडा विधानसभा मतदारसंघात १,२९,३६७ पुरुष, तर १,३३,२९६ महिला मतदार असून, ३९२९ महिला मतदार जास्त आहेत. तर गोंदिया विधानसभा मतदारसंघात १,५१,५०८ पुरुष, तर १,५७,४६८ महिला मतदार असून, ५९६० महिला मतदार जास्त आहेत. म्हणजेच दोन्ही विधानसभा मतदारसंघात ९,८८९ महिला मतदार जास्त आहेत. जिल्ह्यात अगोदरच पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ९,३२४ एवढी जास्त असून, जिल्ह्यात महिलाराज आहे यात शंका नाही. अशात मात्र आता तिरोडा व गोंदिया विधानसभा मतदारसंघात महिलांची संख्या जास्त असल्याने लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक उमेदवारांना महिलांचा आशीर्वादच राजयोग घडवून देणारा ठरणार आहे.
------------------------
अर्जुनी व आमगावमध्ये पुरुषांचे राज्य- तिरोडा व गोंदिया विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या जास्त असतानाच दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघात पुरुषांची संख्या जास्त आहे. अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात १,२६,५९० पुरुष, तर १,२६,२४९ महिला मतदार असून, त्यांच्यात ३४१ पुरुष मतदार जास्त आहेत. त्याचप्रकारे, आमगाव विधानसभा मतदारसंघात १,३०,५०४ पुरुष, तर १,३०,२८० महिला मतदार असून, त्यांच्यात २२४ पुरुष मतदार जास्त आहेत. म्हणजेच, एकूण ५६५ पुरुष मतदार जास्त आहेत.
--------------------------गोंदिया विधानसभेत सर्वाधिक मतदार
- जिल्ह्याच्या अंतिम मतदार यादीत एकूण १०,८५,२७२ मतदारांची नोंद आहे. चार विधासभा मतदारसंघ असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक मतदार गोंदिया विधानसभा मतदारसंघात आहेत. गोंदिया विधानसभा मतदारसंघात ३,०८,९८५ मतदार आहेत, तर सर्वात कमी मतदार अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात आहेत. तेथे २,५२,८३९ मतदार आहेत.--------------------------------
पुरुष व महिला मतदारांची आकडेवारीविधानसभा- पुुरुष- महिला
अर्जुनी-मोरगाव- १,२६,५९०- १,२६,२४९तिरोडा-१,२९,३६७-१,३३,२९६
गोंदिया- १,५१,५०८- १,५७,४६८आमगाव- १,३०,५०४- १,३०,२८०
----------------------पुरुष -महिला मतदारांमधील फरक
विधानसभा - मतदारसंख्या जास्तअर्जुनी-मोरगाव- ३४१ (पुरुष)
तिरोडा- ३,९२९ (महिला)गोंदिया- ५,९६० (महिला)
आमगाव- २२४ (पुरुष)