आॅनलाईन लोकमतगोंदिया : कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात गुरूवार (दि.२६) पासून रक्कम जमा केली जाणार होती. यासाठी राज्यातील ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची छाननीे करण्यात आली. मात्र ६ लाख ५० हजार अर्जांमध्ये त्रृट्या आढळल्याने आता यापैकी केवळ २ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम केली जाणार असल्याचे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गोंदिया येथे सांगितले.गुरूवारी ते गोंदिया येथे एका कार्यक्रमाकरिता आले होते. यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीस राज्यातील ८७ लाख शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी ७७ लाख शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. शेतकऱ्यांनी केलेले आॅनलाईन अर्ज आणि आधारक्रमांक यात पडताळणी दरम्यान प्रचंड तफावत आढळली. बँका व आॅनलाईन अर्जातील माहिती जुळत नसल्याने कर्जमाफीची रक्कम देण्यास विलंब होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवार (दि.२६)पासून पहिल्या टप्प्यात ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्याचे सांगितले होते. मात्र कर्जमाफीच्या अर्जांमध्ये त्रृट्या आढळल्याने ८ लाख ५० अर्जांच्या छाननीनंतर २ लाख अर्जांमध्ये कुठल्याच त्रृट्या आढळल्या नाही. त्यामुळे या २ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. कर्जमाफीचा लाभ अपात्र शेतकऱ्यांना मिळू नये आणि योग्य लाभार्थी वंचित राहू नये,यासाठी कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास विलंब होत असल्याचे सांगत देशमुख यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.दररोज एक तास होणार अर्जांची छाननीकर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आॅनलाईन अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रृट्या आढळल्या. एकाच आधार क्रमांकाचे पाच पाच अर्ज अपलोड केले आहेत. त्यामुळे या अर्जांची योग्य छाननी करण्याचे निर्देश बँका आणि सहकार निबंधक कार्यालयाला दिले आहेत. बँक आणि संबंधित विभागाचे आयटी अधिकारी दररोज एकतास या अर्जांची छाननी करणार आहेत. त्यानंतर दररोज जेवढे अर्ज पात्र ठरतील तेवढ्या शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 3:31 PM
राज्यातील ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम केली जाणार असल्याचे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गोंदिया येथे सांगितले.
ठळक मुद्देसहकार मंत्री सुभाष देशमुख यांची ग्वाहीकर्जमाफीच्या अर्जांमध्ये त्रुटी