गोंदिया : मानवी शरीरातील सर्वच आजारांवर प्राणायामातून मात करता येते. परंतु सुरुवातीपासूनच शरीराला व्यायामाची गरज आहे. प्राणायाममुळे श्वसन संस्था, रक्तसंचार संस्था सर्व सक्रिय होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. कोरोनामध्ये प्राणायामामुळे फुफ्फुसात शुद्ध हवा व दूषित कार्बनडाय ऑक्साईड हे बाहेर टाकले जाते. शरीराची शुद्धी प्राण्यांमुळे हेाते. मनुष्याचे आयुष्य श्वासावर निर्भर असल्यामुळे प्राणायामांचा अभ्यास करणे अधिक गरजेचे आहे. अनुलोम-विलोम प्राणायामामुळे नाक व फुफ्फुसातील दोष नष्ट होतात. सर्दी राहत नाही. श्वसन योग्य होत असल्यामुळे मन शांत राहते. सर्व रोगांवर पाॅवरफुल औषधी म्हणून अनुलोम-विलोम प्राणायाम आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविते आंतरिक शक्ती वाढते. ऑक्सिजन लेव्हल वाढवितो. सर्व विकारांवर रामबाण उपाय म्हणून अनुलोम-विलोम प्राणायाम केले जाते. नाडी शोधन प्राणायामामुळे सर्व नाडी आणि धमन्यांची शुद्धी होते. रक्तसंचार योग्य राहतो. मन एकाग्र होते. शरीरात स्फूर्ती राहते. नाशिकच्या अग्रभागी सुगंधाचा अनुभव होतो. कपालभाती प्राणायामामुळे दोन विधी आहेत. कपालभातीमुळे पचनास मदत, कफ रोग दूर होणे, तिन्ही दिशांना हा नष्ट करतो. उष्णता देतो, रक्त रुग्णांसाठी ४-५ मिनिट केल्यास याचा लाभ होतो. कोविड दूर करण्यासाठी प्राणायाम महत्त्वपूर्ण आहे. या योगामुळे भूक वाढते. श्वासाचे रोगही दूध होतात. उज्जायी प्राणायाम या प्राण्यामुळे सर्दी, खाेकला, गळ्याचे रोग, दमासंबंधी सर्व रोग दूर होतात. गळ्याचे विकार दूर होतात. मनुष्यासाठी प्राणायाम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
......................................
नियमित प्राणायम केल्याचे फायदे
१) - सूर्यभेदन प्राणायाम हा प्राणायाम कफ नष्ट करतो, सर्दी, गळ्याचा त्रास, पोटदुखी, पोटातील किडे दूर करतो. पित्त प्रकृती, कुंडलिनी जागृतीसाठी सूर्यभेदन प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे.
२)- प्राणायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आंतरिक शक्ती वाढते. ऑक्सिजन लेव्हल वाढवितो. सर्व विकारांवर रामबाण उपाय म्हणून अनुलोम-विलोम प्राणायाम केले जाते.
३)- प्राणायामामुळे रक्तसंचार योग्य राहते. मन एकाग्र होते. शरीरात स्फूर्ती राहते. नाशिकच्या अग्रभागी सुगंधाचा अनुभव होतो. कपालभाती प्राणायामामुळे पचनास मदत, कफ रोग दूर होतो.
..........................
प्राणायाम तज्ज्ञ म्हणतात
..................
दररोज सकाळी,सायंकाळी प्राणायाम करून शरीरातील सर्व रोग दूर करता येते. प्रत्येकाने योगाकडे लक्ष द्यावे. नियमित व्यायाम केल्याने मनुष्य निरोगी राहतो. कुठलेही रोग आपल्यापर्यंत योगामुळे पोहचत नाहीत.
डाॅ. माधुरी वानकर (परमार), योग व निसर्गोपचार तज्ज्ञ गोंदिया.
.................................
शरीरात ऑक्सिजन वाढविण्यासाठी, शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नियमित प्राणायाम करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या काळात अनेक रुग्णांनी प्राणायाम करून आपला कोरोना दूर केला. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्राणायाम सर्वांनी नियमित करावे.
प्रा. अर्चना चिंचाळकर, योग शिक्षिका आमगाव.
.......................................
योग हा एक आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. रोज आपल्याला प्राणायाम करायला पाहिजे. मी नियमित प्राणायाम करीत असल्यामुळे निरोगी आहे. कोरोनाच्या काळातही आम्ही डॉक्टरांकडे जायला लागू नये म्हणून योग, प्राणायाम केले.
अनिता आईंद्रेवार, नियमित योग करणारे नागरिक
.............................
योगामुळे कोरोना विषाणूपासूनही आपला बचाव करता येतो. कोरोना झाला तरी नियमित प्राणायाम व योग करणाऱ्यांवर तो भारी पडणार नाही. मी नियमित योग करते. योग व प्राणायाममुळे मोठ्याही आजाराशी आपण लढू शकतो, हे आता स्पष्ट झाले आहे.
तोषिका पटले, नियमित योग करणारे नागरिक
....