शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
4
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
5
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
6
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
7
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
8
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
9
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
10
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
11
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
12
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
13
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
14
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
15
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
16
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
17
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
18
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
19
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
20
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम

दारू पिऊन वर्ग खोलीतच झोपला शिक्षक; कारवाई होतेय मागणी, शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 10:46 PM

दरम्यान वरिष्ठ अधिकार्यांना हा प्रकार माहित होताच शाळा गाठली.

गोरेगाव (गोंदिया) : समाजात शिक्षकाचे स्थान आदर्श आहे. मात्र जिल्ह्यातील एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला बदनाम केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२२) गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्या निंबा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत घडला. या प्रकाराने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा विविध कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी गळणार्या वर्गखोल्या, शिक्षकांची रिक्त पदे, विद्यार्थ्यांची गळती अशी विविध कारणे असतानाही जिल्हा परिषद शिक्षण विभागाला ग्रामीण भागातील शाळा टिकविण्याचे आव्हान आहे. त्यातच आता गोरेगाव तालुक्यातील निंबा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाचा वेगळाच प्रताप पाहावयास मिळाला. येथे कार्यरत शिक्षक जी.आर.मरसकोल्हे हे शाळेत दारू पिऊन आले. झिंगतच त्यांनी वर्गखोलीत प्रवेश केला. त्यांची अवस्था बघून विद्यार्थी घाबरले. त्यांनी याची माहिती मुख्याध्यापक नंदेश्वर तथा आपल्या पालकांना दिली.

दरम्यान वरिष्ठ अधिकार्यांना हा प्रकार माहित होताच शाळा गाठली. यावेळी शिक्षक मरसकोल्हे हे वर्गखोलीत झोपून होते. यावेळी शिक्षक तथा कर्मचार्यांनी दारुड्या शिक्षकाला गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान निंबाच्या सरपंच वर्षा पटले, पंचायत समिती सदस्य राकेश पंधरे, बुधराम बिजेवार, पालक, गावकरी यांनी गोरेगाव पोलिस स्टेशन गाठून यासंदर्भातील तक्रार नोंदविली. शिक्षकाच्या या प्रतापामुळे गावकरी व पालकांनी तीव्र संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.

तीन वर्षांपूर्वी निलंबित

शिक्षक मरसकोल्हे यांना दारूचे व्यसन आहे. देवरी पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते. शिक्षण आयुक्तांकडे कारवाई संदर्भातील प्रकरण प्रलंबित आहे. तसेच शिक्षक मरसकोल्हे यांच्यावर कारवाईसाठी जून व सप्टेंबर २०२२ मध्ये प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे गोरेगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी शिरसाठ यांनी सांगितले.

निंबा शाळेत शिक्षक दारू पिऊन असल्याची माहिती मिळाली, गटशिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याची सूचना दिली आहे. अहवाल प्राप्त होताच कारवाई करणार आहे.- डॉ. महेंद्र गजभिये, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी गोंदिया

निंबा शाळेतील प्रकार निंदनीय आहे. या प्रकारामुळे शिक्षकांची प्रतिमा मलीन झाली आहे.माहिती मिळताच पंचायत समिती येथील कर्मचार्यांना निंबा येथे पाठवून पंचनामा करून शिक्षकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शिक्षकावर पंचायत समिती स्तरावरून कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविणार असल्याचे गोरेगाव पंचायत समिती सभापती मनोज बोपचे यांनी सांगितले.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र