शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
3
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
4
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
5
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
6
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
7
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
8
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
9
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
10
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
11
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
12
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
13
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
14
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
15
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
16
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
17
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
18
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
19
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
20
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी

गोंदियाचे लाेकाे पायलट स्नेहसिंह बघेल यांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण

By अंकुश गुंडावार | Published: June 08, 2024 4:53 PM

रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंद : बघेल यांच्या उत्कृष्ट कार्याची घेतली दखल

गोंदिया : पतंप्रधान नरेंद्र माेदी हे मोदी रविवारी (दि.९) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. या सोहळ्यासाठी देश, विदेशातील विविध मान्यवरांना आमंत्रीत करण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दक्षिण पुर्व मध्य रेल्वे विभागातंर्गत गोंदिया येथे कार्यरत सहाय्यक लोकाे पायलट स्नेह सिंह बघेल यांना निमंत्रीत करण्यात आले. बघेल यांना हे निमंत्रण वंदे भारत टीमचे एक प्रमुख सदस्य म्हणून मिळाल्याची माहिती आहे. यामुळे गोंदिया विभागातील रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

स्नेह सिंह बघेल हे दक्षिण पुर्व मध्य रेल्वे विभागाच्या गोंदिया लाॅबीत कार्यरत वरिष्ठ सहाय्यक लोकोपायलट म्हणून गेल्या चार वर्षापासून आहे. वंदे भारत ट्रेनसह इतर रेल्वे गाड्यांसाठी बघेल यांनी केलेल्या कामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली असून त्यांना रविवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रीत केल्याची माहिती आहे. बघेल हे मिशन कर्मयोगी अंतर्गत प्रशिक्षण प्राप्त करणारे सहाय्यक लोको पायलट आहेत. बघेल नागपूर-बिलासपूर वंदेभारत एक्सप्रेसच्या शुभारंभा दरम्यान लोकाेपायलटच्या दलात सुध्दा सहभागी होते. बघेल यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाल्याने रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण असून हा आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. वंदे भारत ट्रेन ही आधुनिक आणि दर्जेदार सुविधांसाठी देशभरात ओळखली जात असून या ट्रेनमध्ये प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी रेल्वे महाव्यवस्थापक व दक्षिण पुर्व मध्य रेल्वे विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सहाय्यक लोको पायलट स्नेह सिंह बघेले हे कार्यरत आहे. त्यांच्या याच कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतल्याचे बोलल्या जाते.

हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळणे ही माझ्यासाठी समस्त रेल्वे विभागासाठी गौरवाची बाब आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटण्याची संधी मला मिळाली आहे. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून ते अधिक उत्फुर्तपणे काम करण्याची प्रेरणा मिळेल.- स्नेहसिंह बघेल, वरिष्ठ सहाय्यक लोकोपायलट, गोंदिया

बघेल दिल्ली दाखल

स्नेहसिंह बघेल हे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या शपथविधी सोहळयाला उपस्थित होण्यासाठी गोंदियाहून शुक्रवारी (दि.७) दिल्लीला पोहचले. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्यांना शुक्रवारीच दिल्ली येथे पोहचण्याचा निरोप पंतप्रधान कार्यालयाने दिला होता. त्यामुळे बघेल हे शुक्रवारी विमानाने दिल्ली पोहचले.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNarendra Modiनरेंद्र मोदीgondiya-acगोंदिया