गोंदिया- गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका जवळ मोरदोली घाट हायवेवर एलपीजीचा एक टँकर उलटला. यामधून गॅस लिक होत आहे. देवरी फायरची टीम व संबंधित पोलीस विभाग घटनास्थळी पोहोचले आहेत. गोंदिया शोध बचाव पथक व फायर टीमला अलर्ट करण्यात आले आहे. सिच्युएशन ब्रीफिंग......
सद्यस्थितीत रायपूर इंडियन ऑइल कंपनीची टेक्निकल टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे. व नागपूरची टेक्निकल टीम अर्धा तासात स्पॉटला पोहोचत आहे. रायपूरच्या तिमसोबत कॉर्डिनेशन सुरू आहे. टँकर मध्ये हलका प्रकारचा लीक झालेला आहे आणि टँकर सरळ करण्याची कार्यवाही काही वेळात करण्यात येईल.
त्या निमित्ताने दोन फायर टेंडर स्पॉटला असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सडक अर्जुनी येथील फायर टेंडर घटनास्थळी बोलविण्यात येईल. देवरीअग्निशमन विभागाच्या एक फायर टेंडर घटनास्थळी उपलब्ध आहे.