शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

तिरोडा उपजिल्हा रूग्णालयास आनंदीबाई जोशी पुरस्कार

By admin | Published: March 11, 2017 12:21 AM

दरवर्षी जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रुग्णालयासाठी जिल्हा परिषदेतर्फे डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार दिला जातो.

५० हजारांचा धनादेश : जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे रूग्णालय गोंदिया : दरवर्षी जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रुग्णालयासाठी जिल्हा परिषदेतर्फे डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार दिला जातो. सन २०१६-१७ साठी सदर पुरस्कार जि.प. गोंदियाच्या सभागृहात बुधवारी (दि.८) प्रदान करण्यात आला. यात तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयाला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जि.प. गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय तिरोडाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिम्मत मेश्राम यांना ५० हजार रूपयांचा धनादेश, सन्मानपत्र व मानचिन्ह देवून प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला जि.प. अध्यक्षा उषा मेंढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम, शिक्षण सभापती पी.जी. कटरे, महिला व बाल कल्याण सभापती विमल नागपुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे यांची उपस्थिती होती. उल्लेखनिय म्हणजे तिरोडा उपजिल्हा रुग्णालयास सदर आनंदीबाई जोशी पुरस्कार पाचव्यांदा मिळालेला आहे. विशेष म्हणजे याचवर्षी कायाकल्प योजनेंतर्गत राज्यातून उत्कृष्ट रुग्णालयाचा पुरस्कार दिल्ली येथील एम्स सभागृहात तिरोडा उपजिल्हा रूग्णालयास मिळाला आहे. कार्यक्रमात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचा सन्मान करण्यात आला. सदर उपजिल्हा रुग्णालयास मिळालेल्या पुरस्कारांमध्ये येथील कार्यरत विभागाच्या तत्परतेचा व कार्यकुशलतेचाही सहभाग असतो. यामध्ये आयुष विभाग, एएनसी क्लिनीक, सीटीसी विभाग, मलेरिया व फायलेरिया विभाग, टेलीमेडीसीन केंद्र, आरबीएसके कार्यक्रम, आयसीटीसी विभाग, मैत्री क्लिनिक, कुष्ठरोग विभाग, आरएनटीसीपी विभाग यांचा मोलाचा वाटा आहे. (प्रतिनिधी) आणखी मिळणार सुविधा तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात रूग्णांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच रूग्णालयाच्या विकासासाठी अदानी फाऊंडेशनचे सहकार्य लाभत आहे. शासन व अदानी फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने रूग्णांसाठी आणखी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.