गोंदिया : योजना कर्मचारी अंगणवाडी-आशा यांच्या अखिल भारतीय फेडरेशन कृती समितीने योजना कर्मचारी यांच्या मागण्यांना घेऊन २४ रोजी संपाचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र या कृती समितीने एकदिवसीय संप करण्याचे निर्णयानुसार राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) गोंदिया कार्यकारिणीने संपाला पूर्ण पाठिंबा देत सर्व अंगणवाडी सेविकांना २४ सप्टेंबरला संपात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.
राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हाध्यक्ष शकुंतला फटिंग, जिल्हा सचिव आम्रकला डोंगरे, जीवनकला वैद्य, पोर्णिमा चुटे, विठा पवार यांनी दिली आहे. स्कीम कर्मचाऱ्यांना कामगाराचा दर्जा द्यावा ही ४६ व्या आयएलओची शिफारस अमलात आणावी, दरमहा २१००० किमान वेतन द्यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ई.एस.आय.व पी.एफ.चे लाभ लागू करावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सेवामुक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवामुक्त दिली असलेल्या पगाराच्या निम्मे पेन्शन देण्यात यावे, मूलभूत सेवेचे खाजगीकरण करण्याचे प्रस्ताव रद्द करावे जसे की अंगणवाडी, आरोग्य, शिक्षण, कर्मचाऱ्यांना ड्युटी करत असताना कुठल्याही कारणामुळे मृत्यू आल्यास ५० लाखांचे विमा कवच द्यावे, सर्व कामगारविरोधी लेबर कोड रद्द करावी व स्कीम कर्मचाऱ्यांना कामगाराच्या व्याख्येत समाविष्ट करावे, मानधनात कपात करण्यात येऊ नये, पोषण ट्रेकर मराठी भाषेत करण्यात यावे आणि निकृष्ट दर्जाचे मोबाईल परत घेण्यात आदी मागण्या केल्या आहे.
..........
जिल्हा परिषदेवर काढणार मोर्चा
२४ सप्टेंबरला जिल्हा परिषद व जिल्हा अधिकारी कार्यालयावर दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. यात अंगणवाडी सेविकांनी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे, असे राजलक्ष्मी हरिणखेडे, वीणा गौतम, बिरजुला तिडके, सुनिता मलगाम, अनिता शिवणकर, कांचन शहारे, पुष्पलता भगत, शामकला मसराम, संगीता जनबंधू, पुष्पा ठाकुर, अंजना ठाकरे, दुर्गा संतापे, अर्चना मेश्राम, लालेश्वरी शरणागत, ज्योती लिल्हारे, लता बोरकर, देवागना अंबुले यांनी कळविले आहे.