शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘त्या’ मुलांचा देवदूत कवठा पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 6:00 AM

आपण निर्धन आहोत पण समाजासाठी आपण काही तरी करावे अशी त्याने मनात खुणगाठ बांधली. समाजसेवा करीत असताना मिळालेली किर्ती हिच आपली संपत्ती आहे असे तो मानतो. त्याने शिक्षणात स्वारस्य नसलेल्या विद्यार्थ्याना समजूत काढून शिक्षणाच्या प्रवाहात आणायाचा चंग बांधला आहे.

ठळक मुद्दे३१ वर्षांपासून अविरत कार्य सुरू । विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन

संतोष बुकावन ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : एकही मुल शाळाबाह्य राहू नये, यासाठी शासनाने शिक्षणाचा कायदा लागू केला. दरवर्षी यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. यासाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. पण कुठलीही अपेक्षा न ठेवता मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम मागील ३१ वर्षांपासून हरिश्चंद्र धाडू मेश्राम हा करीत आहे. स्वत: अल्पशिक्षीत असूनही इतर विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे. शाळेत न जाता उनाडपणा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर तो देवदूतच आहे. आपला मुलगा शाळेत जात नाही तर पालक हे शिक्षकांची नव्हे तर त्याचीच मदत घेतात.तो अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कवठा डोंगरगाव येथील रहिवासी आहे. त्याची ही समाजसेवा गेल्या ३० वर्षापासून सुरु आहे. तारुण्यात असतांना त्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता वाचली. मरावे परी किर्तीरुपे उरावे, राष्ट्रसंताच्या संदेशाने त्याला प्रेरीत केले. आपण निर्धन आहोत पण समाजासाठी आपण काही तरी करावे अशी त्याने मनात खुणगाठ बांधली. समाजसेवा करीत असताना मिळालेली किर्ती हिच आपली संपत्ती आहे असे तो मानतो. त्याने शिक्षणात स्वारस्य नसलेल्या विद्यार्थ्याना समजूत काढून शिक्षणाच्या प्रवाहात आणायाचा चंग बांधला आहे. हरिश्चंद्र वर्षभर गावोगावी जाऊन उनाड, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधात सायकलने फिरतो, तो दिसला की त्याला बघून खेळत असणारी मुले पळून जातात.त्याची कवठा पोलीस या नावाने ओळख आहे. कवठा पोलीस आला असे पालकांनी सांगितले. तरी मुले त्याच्या नावानेच घाबरतात. ज्या पध्दतीने आरोपींचा पीसीआर घेतला जातो. त्याचप्रकारे वठणीवर आणण्यासाठी हाती घेतलेला मुलाचा १० दिवसांचा रिमांड घेतल्याचे तो सांगतो. या दहा दिवसात तो मुलाला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. चोरी करणे, दारु प्राशन करणे, खर्रा खाणे, शिवीगाळ करणे, काम न करणे, शाळेत न जाणे अशी कृती करणाºया मुलांच्या शोधात तो नेहमी असतो. आजपर्यंत त्यांने अनेकांना वठणीवर आणले आहे. मुलांना वठणीवर आणण्यासाठी तो विविध प्रयोग करतो. मुलांचे हात साखळीने बांधून तो अशा उनाड मुलांना तो आपल्यासोबत दिवसभर स्वत:च्या सायकलने प्रवास करायला लावतो.तो वेळ मिळेल तसा गावागावात सायकलने भ्रमण करतो. शाळेत न जाणाºया विद्यार्थ्याचा शोध घेतो. त्या विद्यार्थ्याच्या पालकांकडून माहिती जाणून त्यांची समंती घेतो व कामाला लागतो. अशी उनाड मुल घरी वेळेवर पोहचत नाही किंवा त्यांना कुणकुण लागली तर ती पळून जातात यासाठी तो रात्री-अपरात्री त्यांच्या घरी जातो. त्या विद्यार्थ्याला आपल्या ताब्यात घेतो. गावातील पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष यांचेकडे घेऊन जावून त्या विद्यार्थ्याची समजूत घालतो. त्या विद्यार्थ्याने होकार दिला तर ठिक अन्यथा त्याला आपल्यासोबत घेऊन येनकेन प्रकारे तयार करतो. अशावेळी त्या विद्यार्थ्याच्या आंघोळ व भोजनाची तो व्यवस्था करतो, त्यांचे हे मागील ३१ वर्षांपासून सुरू आहे. अनेकांना यापध्दतीने त्यांने दुरुस्त केले. ते आता पालक बनले आहेत असे तो सांगतो. चांगले कार्य असले तरी अडचणी येतातच याची त्याला जाणीव आहे.हे जोखीमेचे काम आहे, असे करत असताना भीती वाटत नाही काय?आपले प्राण यात कशाला घालविता? असा सल्ला नातेवाईक आपल्याला देतात. पण आपण करीत असलेली ही समाजसेवक आहे. कशाला घाबरायचे? हा ध्यास घेऊन माझे कार्य अविरत सुरुआहे.यासाठी चार ते पाचदा पोलिसांनाही सामोरे जावे लागले.आपण परिसरातच नव्हे तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात हे कार्य सायकलने फिरुन करतोय. आता माझ्या या मोहिमेत मला बिडटोलाचा कृपाल गणवीर हा हातभार लावत आहे. आपण केवळ पाचवा वर्ग शिकलो. शेती करणे तसेच मिळेल त्या कामावर जाणे हा आपला व्यवसाय आहे. पण या समाजसेवेसाठी मी अधिक वेळ देतो. मला शासनाकडून काहीच मदत मिळत नाही पण विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आला तर पालक आपोआपच पैसे देतात असे हरिचंद्र सांगतो.

टॅग्स :Policeपोलिस