गोंदिया : पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त नगर परिषदेच्या वतीने नेहरू चौकातील नेहरू पुतळा व परिसराची स्वच्छता करण्यात आली नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करीत १६ नोव्हेंबर रोजी शहीद भोला काँग्रेस भवन ते नगर परिषदेपर्यंत मोर्चा काढला. तसेच मार्गातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना कार्यकर्त्यांनी श्रद्धेने नमन केले. यानंतर मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देवून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.निवेदनानुसार, नगराध्यक्ष यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेवून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीसुद्धा करण्यात आली. प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वच्छता अभियानाला आपले मिशन माणले. मात्र गोंदिया नगर परिषदेने अशी चूक का केली? हे पूर्वग्रहदूषित असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.याप्रसंगी प्रामुख्याने अशोक चौधरी, पृथ्वीपालसिंह गुलाटी, अनिल गौतम, अपूर्व अग्रवाल, संदीप ठाकूर, संदीप रहांगडाले, अजयसिंग गौर, अभिलाष मोहंती, उपाशंकर गर्ग, महेश माधवानी, अमरचंद अग्रवाल, नगरसेवक व्यंकट पाथरू, मनोज पटनायक, देवा रूसे, कदीर शेख, कृष्णकुमार लिल्हारे, बलजीतसिंग बग्गा आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काँग्रेस कार्यकर्त्यांचा रोष
By admin | Published: November 19, 2015 2:26 AM