शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

५० टक्के अनुदानावर पशुसंवर्धनाच्या योजना

By admin | Published: June 26, 2016 1:45 AM

शेतीपूरक जोडधंदा म्हणून पशुपालन व कुक्कुटपालन व्यवसाय करुन आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी पशुसंवर्धन

गोंदिया : शेतीपूरक जोडधंदा म्हणून पशुपालन व कुक्कुटपालन व्यवसाय करुन आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर विविध योजना राबविण्यात येत आहे. राज्यस्तरीय योजनेंतर्गत नावीन्यपूर्ण योजना सन २०१६-१७ या वर्षात राबविण्यात येणार आहेत. सहा, चार किंवा दोन दुधाळ गाई किंवा म्हशीचे गट वाटप करण्यात येणार आहे. ही योजना सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणार आहे. ठाणबंध पध्दतीने शेळीपालन करणे व एक हजार मांसल पक्षी संगोपनासाठी पक्षीगृह बांधण्यासाठी राज्यस्तरीय योजना ५० टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहे. या योजनेचे अर्ज संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात १२ जुलैपर्यंत स्वीकारण्यात येतील. ज्या लाभार्थ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी मागील तीन वर्षामध्ये वरील योजनेचा लाभ घेतला असेल किंवा जिल्हा योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांनी नव्याने अर्ज सादर करु नये. अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी पंचायत समती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त गोंदिया यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)