कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गरजूंच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आज समाजातून कित्येकांचे हात पुढे येत आहेत. धान्य व जेवणाची सोय करून गरजूंची भूक शमविली जात आहे. अशात स्थलांतरण करणाऱ्या मजुरांची परवड होत असून महिला व लहान-लहान मुलांसह त्यांचा उपाशी पोटी प्रवास सुरू आहे. अशा स्थलांतरण करणाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी येथील अन्नपुर्णा ग्रुप धावून आला आहे. नवीन बायपासवर या लोकांसाठी ग्रुुपने ‘स्टॉपेज’ दिला आहे. तेथे त्यांच्या चहा-नाश्ता व जेवण तसेच थांबण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.‘लॉकडाऊन’मुळे हातावर कमावून खाणाºयांची परवड होत आहे. मात्र अशांना मदत करण्यासाठी समाजातून कित्येकांचे हात पुढे आले आहेत. सामाजिक कार्यकर्ता व संस्थाच काय आता राजकीय पक्षांकडूनही धान्य व जेवणाची सोय करून दिली जात आहे. त्यामुळे स्थायी असलेल्या अशा गरजूंची कशी ना कशी सोय होत असल्याचे दिसत आहे. मात्र स्थलांतरण करीत असलेल्यांची समस्या कायम आहे.हाताला काम नसल्याने खिशात पैसा नाही. अशात उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने परराज्य व जिल्ह्यात कमावण्यासाठी गेलेल्या मजुरांचे जत्थे आता परतू लागले आहेत. उपाशी व तहानलेल्या लोकांच्या या जत्थ्यांमध्ये महिला व लहान-लहान मुलांचाही समावेश आहे.पायी-पायी चालत जात असलेल्या अशा मजुरांना अन्नपूर्णा ग्रुपचे सदस्य संतोष कायते बिस्कीट तर कधी चिवडा अशी काही ना काही व्यवस्था करून देत होते. गुरूवारी (दि.२३) अशाच काही लोकांना ते बिस्कीट व चिवडा वाटत असताना हैदराबाद येथील ४०-५० जणांचा जत्था तेथे आला व त्यांच्याकडे आशेने बघू लागला. मात्र त्यांच्याकडे उरले नव्हते व कायते यांनाही हे खटकू लागले. अशात मात्र त्यांचे मित्र मनोज पटले, ईश्वर वाढई व कालू मेश्राम तेथे आले व परिस्थिती बघता त्यांनी लगेच त्यांच्या चहा-नाश्ता व जेवणाची धावपळ सुरू केली. कायते यांनी त्यांच्या शेतातील झोपडीत त्यांना थांबण्याची व बोअरवेलवर आंघोळीची सोय करून दिली. चहा-नाश्ता दिल्यानंतर त्यांना दुपारचे जेवण व शिदोरी देऊन रवाना केले.आज तर झाले मात्र दररोज येथून जाणाऱ्या गरजूंची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न त्यांना खटकत होता. अशात कायते यांचे मित्र विनोद पंधरे, संतोष पटले, कि सन भगत, श्याम बिसेन, पंकज अंबुले, विजय गुप्त तसेच अन्नपूर्णा ग्रुपचे प्रतीक कदम, जयेश रामादे आदि एकत्र आले व त्यांनी लगेच स्वयंपाकासाठी लागणारे भांडे तसेच प्रत्येकी एक हजार रूपये जमा करून बायपासने जाणाºया प्रत्येकाच्या जेवणाची सोय करण्याचा संकल्प घेतला.आतापर्यंत त्यांनी २०० हून अधिक जणांना जेवण व शिदोरी देत आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत आहेत.दुकानदारांना दिले मोबाईल क्रमांकबायपासवरील या चौकात काही दुकाने असून त्यांच्याकडे कायते यांनी मोबाईल क्रमांक दिले आहे. कुणालाही जेवणाची गरज असल्यास त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला जातो. लगेच ते आपल्या मित्रांसोबत एकत्र येऊन जेवणाची सोय करून देत आहेत. त्यामुळे आता या मार्गाने जाणाऱ्या मजुरांसाठी तेवढीच सोय होत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या कार्याची दखल घेत आता छोटा गोंदिया परिसरातील नागरिकही त्यांना धान्य पुरवून मदतीचा हातभार लावत आहेत.
स्थलांतरितांच्या सोयीसाठी अन्नपूर्णा आल्या धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 5:00 AM
‘लॉकडाऊन’मुळे हातावर कमावून खाणाºयांची परवड होत आहे. मात्र अशांना मदत करण्यासाठी समाजातून कित्येकांचे हात पुढे आले आहेत. सामाजिक कार्यकर्ता व संस्थाच काय आता राजकीय पक्षांकडूनही धान्य व जेवणाची सोय करून दिली जात आहे. त्यामुळे स्थायी असलेल्या अशा गरजूंची कशी ना कशी सोय होत असल्याचे दिसत आहे. मात्र स्थलांतरण करीत असलेल्यांची समस्या कायम आहे.
ठळक मुद्देनवीन बायपासवर ‘स्टॉपेज’ : अन्नपूर्णा ग्रुप करीत आहे मजुरांची संपूर्ण व्यवस्था