तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:14 PM2019-07-24T23:14:19+5:302019-07-24T23:14:44+5:30
तालुक्यातील ८० टक्के शेतांमधील धानाचे पºहे पूर्णत: नष्ट झाले. त्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने देवरी तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यातील ८० टक्के शेतांमधील धानाचे पºहे पूर्णत: नष्ट झाले. त्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने देवरी तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी मंगळवारी (दि.२३) उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
सध्या सुरु असलेल्या खरीप हंगामात तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे रोवणी होऊ शकली नाही व शेतातील ८० टक्के पºहे नष्ट झाले आहेत. हंगामाची वेळ निघून गेल्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळ पडलेला दिसत आहे. तरी शासनाने तत्काळ देवरी तालुक्यात दुष्काळ घोषित करुन दुष्काळाचा मोबदला शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये द्यावा, पीक विम्याची रक्कमही शासनाने स्वत: भरावी, रोजगार हमी योजनेचे काम त्वरित सुरु करावे तसेच शासकीय रुग्णालयात औषध, डॉक्टरांची सोय व पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी तालुका कॉँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे.
आपल्या मागणीसाठी तालुका कॉँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी (दि.२३) उपविभागीय अधिकारी यांच्या प्रतिनिधी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना, माजी आ. रामरतन राऊत, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, तालुकाध्यक्ष संदीप भाटीया, माजी उपसभापती संगीता भेलावे, शेडेपारच्या सरपंच माधुरी राऊत, गडेगावच्या सरपंच सविता वालदे, किसान आघाडी अध्यक्ष धनपत भोयर, युकाँचे माजी अध्यक्ष अविनाश टेंभरे, एन.एस.यु.आईचे तालुकाध्यक्ष अमित तरजुले, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता माणिक आचले, कमलेश पालीवाल, दलित आघाडी अध्यक्ष सुरेंद्र बंसोड, सुभाष कोचे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.