लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : ग्रामीण भागातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यासाठी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक अठरा हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. नवोदय विकास निधीच्या नावाखाली आकारलेल्या शुल्क रचनेमुळे पालक व विद्यार्थ्यात असंतोष आहे.केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या सकल्पनेतून देशातील ग्रामीण भागातील हुशार व होतकरु विद्यार्थ्यासाठी १९८६ पासून जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. देशातील २८ घटक राज्य व ७ केंद्रशासीत प्रदेशात ही ७२९ विद्यालये कार्यान्वित आहेत.महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात नवोदय विद्यालये आहेत. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता दहावीला दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात ८० विद्यार्थ्याना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व मोफत शिक्षण त्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी ८० टक्के जागा राखीव असल्याने अलीकडे बहुतांश विद्यार्थ्याचा नवोदयकडे कल वाढला आहे.परंतु मागील काही वर्षापासून सर्वासाठी मोफत असलेल्या नवोदय विद्यालयात विद्यार्थ्याची वर्गवारी पाडून फी घेण्याचे सत्र शासनाने सुरु केले आहे. आधी काही वर्ष इयत्ता नववी ते बारावीपर्यंत प्रती विद्यार्थी प्रती महा २०० रुपये फी घेण्यात येत होती. ती ३१ आॅगस्ट २०१७ पासून दोनशे ऐवजी सहाशे रुपये करण्यात आली आहे. त्यातही नवोदय विद्यालय समितीने २० डिसेंबर २०१७ रोजी परिपत्रक क्र. एफ. क्र.१६-१४/२०१७/एनवीएस(एसए) १३६ नुसार नवोदय विद्यालयात इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षण घेत असलेल्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना दरमहा १५०० प्रमाणे वार्षीक १८ हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.शुल्कवाढीला विकास निधीचे नावसदर शुल्क नवोदय विकास निधीच्या गोंडस नावाखाली सर्व प्रवर्गाच्या कर्मचाºयांच्या पाल्यांना सक्तीने आकारण्यात आली.यामुळे मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याच्या नवोदय विद्यालयाच्या मूळ तत्वावरच घाला घातला गेला असून सर्व विद्यार्थी व पालकांमध्ये यामुळे तीव्र असंतोष आहे.ग्रामीण भागातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यासाठी मोफत शिक्षण देणाऱ्या नवोदय विद्यालयात नवोदय विकास निधीच्या नावाखाली शुल्क आकारणे म्हणजे नवोदय संपविण्याचा शासनाचा डाव आहे. आधी दोनशे मग सहाशे व आता १५०० रुपये फी आकारुन शासनाद्वारे हळूहळू सर्वच विद्यार्थ्यांना फी आकारुन आर्थिक दहशत निर्माण करीत आहे.- नाना पटोले, माजी खासदारनवोदय विद्यालय समितीचे २० डिसेंबर २०१७ चे पत्रकानुसारच इयत्ता नववी ते बारावीच्या कर्मचाºयांच्या पाल्यांसाठी फी आकारण्यात आली आहे. तशी सूचना नोटीस बोर्डावर व विद्यार्थ्याना देण्यात आली आहे.-एम.एस.बलवीर, प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध
नवोदयच्या विद्यार्थ्यांना लागणार वार्षिक १८ हजार शुल्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 9:35 PM
ग्रामीण भागातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यासाठी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक अठरा हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
ठळक मुद्देमोफत शिक्षणाचा बोजवारा : शेकडो विद्यार्थ्यांना भुर्दंड, पालकांमध्ये रोष