लोकमत न्यूज नेटवर्कसरांडी : जन्म देणारी माता ही आई आहे. परंतु त्यांच्यावर संस्कार घडविणारी दुसरी माता शाळा आहे. यातून उद्याचे नागरिक घडतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांनी केले.गुलाबटोला केंद्रातील ग्राम विहिरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेह सम्मेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन पंचायत समिती सदस्य जया धावडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती प्रेम रहांगडाले, विहीरगावचे सरपंच मुकेश रहांगडाले, रंगमंच पूजक सरपंच तुमेश्वरी बघेले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश भुरे, सुधा ठाकरे, गणेश कुतराहे, भोजराम काळसर्पे, प्रदीप नेवारे, कल्पना ठाकरे, स्वाती टेंभेकर, उपसरपंच जितेंद्र चौधरी, हरि बारेवार, श्याम नेवारे, दीपमाला टेंभेकर, गजानन ठाकरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी धावडे यांनी, विद्यार्थी हे ओल्या मातीसारखे असतात. आपण त्यांना जसे घडवू, आकार देवू तसे घडणार असे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सरपंच मुकेश रहांगडाले यांनी मांडले. आभार एल.बी. बघेले यांनी केले. कार्यक्रमासाठी एस.बी. बोपचे, एस.एस. भोंगाडे आदिंनी सहकार्य केले.
मुलांना घडविणारी दुसरी माता शाळा होय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 21:48 IST
जन्म देणारी माता ही आई आहे. परंतु त्यांच्यावर संस्कार घडविणारी दुसरी माता शाळा आहे. यातून उद्याचे नागरिक घडतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांनी केले.
मुलांना घडविणारी दुसरी माता शाळा होय
ठळक मुद्देपी.जी.कटरे : विहीरगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन