शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जादूटोणाविरोधी कायद्याने व्यक्ती विज्ञानवादी बनतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:01 AM

स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करु न स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण करणारी यंत्रणा वर्षानुवर्षे सुरु आहे.

ठळक मुद्देश्याम मानव : श्रद्धा ही डोळस असावी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करु न स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण करणारी यंत्रणा वर्षानुवर्षे सुरु आहे. जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली तर प्रत्येक व्यक्ती हा विज्ञानवादी होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक तथा राज्य जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाºया समितीचे सहअध्यक्ष प्रा.श्याम मानव यांनी केले.येथील संथागार येथे रविवारी (दि.१९) ‘वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया’ आणि जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर जाहीर व्याख्यान देताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा संघटक प्रा.डॉ.प्रकाश धोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, निशा भूरे, संजय झुरमूरे प्रामुख्याने उपस्थित होते.प्रा. मानव म्हणाले, आमचा देवाधर्माला विरोध नाही. देवाधर्माच्या नावाखाली सामान्य माणसाच्या फसवणुकीला आमचा विरोध आहे. संत परंपरा आणि बुवाबाजी ही वेगळी आहे. ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याच्याबद्दल शंका ठेवू नये. श्रद्धेचे रुपांतर केव्हा अंधश्रद्धेमध्ये होते हे कळत नाही. त्यामुळे श्रद्धा ही डोळस असली पाहिजे, ती आंधळी नसावी. तिची चिकित्सा करता आली पाहिजे, यासाठी जादूटोणा विरोधी कायदा असल्याचे सांगितले.‘वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया’ या विषयावर प्रकाश टाकताना प्रा.मानव यांनी, डेरा सच्चा सौदाचा नायक बाबा रामरहीम हा एका रात्रीतून खलनायक कसा झाला. प्रसारमाध्यमांनी गुरमीत रामरहिमच्या अनेक गोष्टी जगापुढे आणून खळबळ माजविली. अनेक बुवा-बाबा आज गजाआड असल्याचे त्यांनी सांगितले. काही धर्मातील पुरोहित, मौलवी, बाबा, पादरी हे धार्मिक तरतुदींचा वापर आपल्या फायद्यासाठी करुन घेऊन त्यातून स्त्री शोषणाचा मार्ग शोधून काढत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याच्या सर्व १२ कलमांची माहिती दिली.पालकमंत्री बडोले यांनी, समाजातील अनिष्ट परंपरा, वाईट चालीरिती, अंधश्रद्धा, शोषण व बुवाबाजीच्या नावावर होणारी लुटमार थांबविण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा शासनाने केला आहे. या कायद्याची जनजागृती करण्याचे काम सामाजिक न्याय विभाग करीत आहे. अंधश्रद्धेचे निर्मुलन करुन सशक्त समाज निर्माण करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अत्यंत उपुयक्त असल्याचे मत व्यक्त केले.पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी, सुशिक्षीत आणि सुसंस्कृत समाज अंधश्रध्देला बळी पडणे म्हणजे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब धोकादायक आहे. जिल्ह्यात जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाºयांना व्हावी यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेमुळे कायद्याच्या तरतुदीची माहिती कशाप्रकारे गुन्हे दाखल करावे, याची माहिती मिळण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रकाश धोटे यांनी केले.संचालन व आभार अमर वºहाडे यांनी मानले. कार्यक्र माला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.