शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

१६ कर्मचाऱ्यांना पाठविले एओपीत

By admin | Published: February 13, 2017 12:17 AM

जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील असल्याने येथे पोलिसांना सतर्क रहावे लागते. त्यामुळे नलवाद्यांच्या हालचालींवर नजर

नक्षलवाद्यांच्या हालचालींवर ठेवणार नजर : सी-६० जवानांसोबत करणार सर्च आॅपरेशन गोंदिया : जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील असल्याने येथे पोलिसांना सतर्क रहावे लागते. त्यामुळे नलवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी देवरी येथील पोलीस उपमुख्यालयात कार्यरत १६ कर्मचाऱ्यांना १० फेब्रुवारी रोजी पोलिस अधीक्षकांनी एओपींमध्ये पाठविले आहे. यात मगरडोह एओपींमध्ये सात जवान तर भरनोली एओपीत नऊ जवानांना पाठविले आहे. गोंदिया अति संवेदनशील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. शिवाय जिल्ह्यातील जुना इतिहास बघता नक्षल्यांच्या कारवायांतून जिल्हा नेहमीच त्यांच्या टार्गेटवर असल्याचेही स्पष्ट दिसून येते. नक्षल्यांकडून संधी मिळेल तेव्हा काहीना काही कारवाया जिल्ह्यात केल्या जातात. अशात मोठ्या प्रमाणात नुकसान व जिवीतहानीही भोगावी लागते. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या कारवायांतून होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्या या कारवायांवर सातत्याने नजर ठेवून त्यांना वेळीच मुठमाती देणे अधिक गरजेचे आहे. अशात छत्तीगड व महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यात वाढत असलेल्या नक्षल कारवायांना पाहून जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी तसेच सी-६० कमांडोसोबत नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी देवीर पोलीस उप मुख्यालयातील १६ कर्मचाऱ्यांना पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी सशस्त्र दूरक्षेत्र (एओपी) येथे संलग्न केले आहे. यात पोलीस हवालदार माधवराव बन्सोड (बक्कल नं.७३१), उरकुडा राऊत (ब.नं.२७७), मधुकर वैद्य (ब.नं.१०५९), पोलीस नायक विनादे कोल्हारे (ब.नं.१२४१), अजय सव्वालाखे (ब.नं.११४१), राजू वनवे (ब.नं.११८३), इर्श्या वाघधरे (ब.नं.१२७९), दुर्योधन मडावी (ब.नं.१२५५), गोपीचंद इस्कापे (ब.नं.१२३६) यांना शसस्त्र दूरक्षेत्र भरनोली येथे पाठविण्यात आले आहे. तर पोलिस हवालदार सुखदेव केंद्रे (ब.नं.१३९५), रमेश कुंभलकर (ब.नं.१०११), पोलीस नायक सुरेश चव्हाण (ब.नं.१५८४), धर्मेंद्र परतेकी (ब.नं.१९६७),सहाय्यक फौजदार चालक प्रदीप पेटकुले (ब.नं.७९१), लक्ष्मीनारायण मिश्रा (ब.नं.७६८) व शैलेश राऊत (ब.नं.१३५४) यांना शसस्त्र दूरक्षेत्र मगरडोह येथे पाठविण्यात आले केले आहे. सदर कर्मचारी राज्य राखी पोलीस बलातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने नक्षल विरोधी अभियान राबवतील. (तालुका प्रतिनिधी) सर्चिंग सातत्याने सुरूच नक्षलवाद्यांचे रेस्टझोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातही नक्षलवाद्यांकडून घातपात करण्यासाठी कसलीही कसर सोडली जात नाही. भूसुरूंगस्फोट घडविणे, काळे झेंडे लावणे, पत्रके टाकणे, भारत सरकारच्या विरूद्ध कारवाया करण्याचे हिंसक काम नक्षलवाद्यांकडून करण्यात येते. त्यांचे मनसुबे वेळीच हाणून पाडण्यासाठी पोलीस विभागाकडून वेळीच उपाय योजना केल्या जातात. नक्षलवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवून वेळीच त्यांच्या कारवायांना लगाम लावण्यासाठी पोलिसांना सातत्याने जंगलात सर्च मोहीम राबवावी लागत आहे.