आॅनलाईन लोकमतवडेगाव : येत्या हिवाळी अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर उठलेला पेन्शनचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने राज्यभर सर्व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करुन वेठबिगारानाही लाजवेल अशी अंशदायी पेन्शन बंद करा या मागणीसाठी लढा सुरू आहे. राज्यशासनातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाने अंशदायी पेंशन योजना लागू केली परंतु सदर तरतूद नाही. या समस्येवर लक्ष केंद्रीत करुन कर्मचाºयांच्या प्रश्न उचलून धरण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील सर्व आमदारांना निवेदन देण्यात आले.तिरोडा व गोरेगाव तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे आ. विजय रहांगडाले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, सर्व सदस्य,महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. गोंदिया तालुका कार्यकारीणीतर्फे आ. गोपालदास अग्रवाल यांची भेट घेऊन विषयाचे गांभीर्य विषद करण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य, महिला उपस्थित होत्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले. अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुका कार्यकारिणीतर्फे ना. बडोले यांना निवेदन देण्यात आले. आमगाव येथे आमगाव व सालेकसा तालुका कार्यकारिणीतर्फे आ. पुराम यांना निवेदन देण्यात आले.
‘त्या’ कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:03 PM
येत्या हिवाळी अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर उठलेला पेन्शनचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देजुनी पेंशन हक्क संघटनेची मागणी : अंशदायी पेंशन बंद करा