गोंदिया : नगर परिषदेत सन १९९३ पूर्वीपासून कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करून त्यांना पेन्शन लागू केली जावी, या मागणीसाठी नगर परिषद कर्मचारी संघर्ष समितीने माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना निवेदन दिले.
नगर परिषदेत सन १९९३ नंतर कार्यरत सुमारे २००-३०० रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे यासाठी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी प्रयत्न केले होते. परिणामी २-३ वर्षांपूर्वीच सन १९९३ नंतर लागलेले सर्वच कर्मचारी स्थायी झाले आहेत. मात्र, १९९३ पूर्वी लागलेले कर्मचारी स्थायी झाले नसल्याने त्यांनी अग्रवाल यांना निवेदन देत स्थायी करून पेन्शन लागू करण्याची मागणी केली आहे. यावर अग्रवाल यांनी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकासमंत्री एकनाथ शिंगे यांच्याकडे हा विषय मांडून सकारात्मक निर्णयासाठी जमेल ते प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना, समितीचे सुरेंद्र बंसोड, नरेंद्र तिवारी, दिलीप चाचीरे, राजेश शर्मा, राजेश टेंभूर्णे, जितेंद्र वैष्णव, गणेश भेलावे, किशोर वर्मा, किशोर उके, योगेश वर्मा, सुनील घोडमारे, राजेश राणा, वसंत वैद्य यांच्यासह अन्य उपस्थित होते.