फुटाना : ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे देवरी तालुक्यातील ग्राम सुकडी ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी प्रदीपकुमार डांगे यांनी दिले आहेत.
कोरोना संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती साथरोग अधिनियम १९९७ ची अंमलबजावणी सुरू झाली. अशात प्रस्तावित निवडणुकांमध्ये वाढणारी तीव्र जोखीम बघता कोरोना संपेपर्यंत शासनाने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. यामुळे ज्या ग्रामपंचायतींच्या कमिटीची मुदत ज्या दिवशी संपते त्याच दिवशी प्रशासक बसविला जात आहे. ग्रामीण विकास विभागाने कोरोना संपेपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशात सुकडीची निवडणूक सध्या घेण्यात येणार नाही. परंतु कालावधी झाल्यामुळे या ग्रामपंचायतवर यामुळे सुकडी ग्रामपंचायतवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी रवींद्र. पी.पराते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.