लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील देवरी-नवेगाव उपसा या महत्त्वपूर्ण उपसा सिंचन योजनेला महाराष्ट्र राज्यपाल विद्यासागर राव यांनी अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे या परिसतील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मोठी मदत होणार आहे. आ.गोपालदास अग्रवाल यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन योजनेला राज्यपालांची मंजुरी मिळवून घेतली.शेतकºयांची सिंचनाची समस्या दूर व्हावी, त्यांना दोन्ही हंगामात उत्पन्न घेता यावे, यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी दीडशे कोटी रुपयांच्या देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेला मंजुरी देण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी शुक्रवारी (दि.२२) रोजी संबंधित विभागाच्या अधिकाºयांची नागपूर येथे बैठक घेतली. या बैठकीत आ.अग्रवाल यांनी राज्यपालांना विनंती केली गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीचे पाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहुन जाते. याच वाहुन जाण्याऱ्या पाण्याचा उपयोग शेतीच्या सिंचनासाठी केल्यास शेतकºयांना मोठी मदत होईल. देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील २० गावांतील जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय होईल. शिवाय १० हजारावर शेतकरी कुटुंबाना याची मदत होणार असल्याची बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ.अग्रवाल यांच्या आग्रहानंतर योजनेचे महत्त्व ओळखत राज्यपाल विद्यासागर राव यांनी देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेला अंतीम मंजुरी दिली. गोंदिया तालुक्यातील काही भाग केवळ बाघ नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे नवीन उपसा सिंचन योजना झाल्यास शेतकऱ्यांना त्याची मोठी मदत होणार होती. हीच बाब ओळखून आ.अग्रवाल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. विशेष म्हणजे मागील पाच ते सहा वर्षाच्या कालावधीत प्रथमच उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी रजेगाव-काटी, तेढवा-सिवणी व डांर्गोली उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवून दिली. देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिल्याबद्दल राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या उपसा योजनेला मंजुरी मिळाल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
देवरी-नवेगाव उपसा योजनेला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 9:30 PM
तालुक्यातील देवरी-नवेगाव उपसा या महत्त्वपूर्ण उपसा सिंचन योजनेला महाराष्ट्र राज्यपाल विद्यासागर राव यांनी अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे या परिसतील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मोठी मदत होणार आहे.
ठळक मुद्देराज्यपालांची हिरवी झेंडी : १० हजार हेक्टरला होणार सिंचन