गोंदिया : जिल्हा नियोजन समितीत जन सुविधा योजनेअंतर्गत १ कोटी ५८ लाखाच्या विकास कामांना मंजूरी दिली. स्मशान भूमी रस्ता, दहन शेड या नीधीतून तयार करण्यात येणार आहे. सदर कामे ४४ गावांत होणार आहेत. मुरपार येथे दीड लाखातून स्मशान भूमीचा रस्ता, खातिया येथे तीन लाखातून स्मशान भूमीत सभा मंडप, गर्रा बु. येथे तीन लाखातून सभामंडप, कटंगटोला येथे ३ लाख ८० हजारातून सभामंडप, मोगर्रा येथे विंधन विहिरीसाठी ८० हजार, फुलचूरटोला येथील कब्रस्थानासाठी तीन लाखातून आवारभिंत, रापेवाडा येथील तीन लाखातून स्मशानभूमीची आवारभिंत, रापेवाडा येथील एक लाखातून रस्ता, बिरसोला सभामंडपासाठी तीन लाख, जिरुटोला रस्त्यासाठी तीन लाख, धामणगाव रस्त्यासाठी तीन लाख, तेढवा रस्त्यासाठी तीन लाख, दासगाव खु. रस्त्यासाठी तीन लाख, काटी येथे चार लाखातून खडीकरण, मोरवाही येथे तीन लाखातून सभामंडप, मुंडीपार खुर्द येथे दीड लाखातून रस्ता, कटंगी येथे तीन लाखातून कब्रस्थान संरक्षण भिंत, जब्बारटोला येथील स्मशान शेड बांधकामासाठी तीन लाख, नागरा ग्रामपंचायत भवनासाठी बारा लाख, रतनारा तीन लाख, देवरी, रायपुर सभामंडपासाठी व प्रत्येकी तीन लाख, पिंडकेपार रस्त्यासाठी तीन लाख, ढाकणी येथील आवारभिंतीसाठी तीन लाख, इंदिरा नगर स्मशान शेडसाठी तीन लाख, निलज तीन लाख, गिरोला ग्रा.पं.साठी १२ लाख, शिवनी तीन लाख, पांढराबोडी दीड लाख, माकडी तीन लाख, किन्ही तीन लाख, खळबंदा तीन लाख, दांडेगाव, मजीतपुर, धापेवाडा व मुरदाडा गावासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये आ. गोपालदास अग्रवाल यांनी मंजूर करवून घेतले आहे. (तालुका प्रतिनिधी)
दीड कोटीच्या विकास कामांना मंजुरी
By admin | Published: April 03, 2017 1:41 AM