लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मेडिकल कौन्सील आॅफ इंडियाने (एमसीआय) बुधवारी (दि.२९) मंजुरी दिली आहे. त्यामुळे एमबीबीएसची १०० विद्यार्थ्यांची चौथी बॅच सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होवून तीन वर्षे लोटली.मात्र अद्यापही वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत नसल्याने आणि अनेक सोयी सुविधांचा अभाव असल्याने यावर एमसीआने अनेकदा ताशेरे ओढले होते. शिवाय एमसीआयच्या चमूने वैद्यकीय महाविद्यालयाला काही त्रृटी दूर करण्याचे निर्देश दिले होते. या त्रृटी दूर झाल्या किवा नाही याची पाहणी करण्यासाठी मागील महिन्यात एमसीआयची चमू गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. या चमूने दोन दिवस मुक्काम करुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. या चमूच्या अहवालानंतरच एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी मिळणार होती. ही मंजुरी न मिळल्यास वैद्यकीय महाविद्यालया च्या अस्तित्वाबाबत सुध्दा प्रश्न चिन्ह उपस्थित झाला असता. त्यामुळे एमसीआय यासंदर्भात काय भूमिका घेते याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शहरवासीयांचे लागले होते. मात्र बुधवारी एमसीआयने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाच्या अभ्यास क्रमाला मंजुरी देत असल्याचे पत्र दिले. यामुळे चौथ्या वर्षाच्या १०० विद्यार्थ्यांची बॅच सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे आता पाचव्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी मिळण्यासाठी पुढील वर्ष प्रयत्न केले जाणार आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरळीतपणे सुरू होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी मिळाण्याला घेवून सुरू असलेल्या चर्चेला सुध्दा पूर्णविराम मिळाला आहे.
मेडिकल कॉलेजच्या चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 9:24 PM
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मेडिकल कौन्सील आॅफ इंडियाने (एमसीआय) बुधवारी (दि.२९) मंजुरी दिली आहे. त्यामुळे एमबीबीएसची १०० विद्यार्थ्यांची चौथी बॅच सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठळक मुद्देएमसीआयची हिरवी झेंडी : चर्चेला पूर्णविराम, आता लक्ष पाचव्या वर्षाकडे