लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम पांजरा येथे कोल्हापूरी बंधाºयांच्या बांधकामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. यासाठी राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यासंबंधीचे आदेश काढले आहे.मागील ३-४ वर्षांपूर्वी ग्राम पांजरा येथे कोल्हापूरी बंधाºयाच्या बांधकामासाठी शासकीय कार्यक्रम आयोजीत करून लघू पाटबंधारे विभागाच्या स्थानिकस्तरच्या अधिकाºयांनी भूमिपूजन केले होते. मात्र बंधाºयाला मंजूरी नसल्याने व योजना बंद झाल्याने बंधाºयांचे बांधकाम झालेच नाही. आमदार अग्रवाल यांनी बंधाºयासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करवून मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करून बंधाºयाला मंजूरी मिळवून घेतली.त्यामुळे आता येत्या २-३ महिन्यांत या बंधारा बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर बंधाºयाचे बांधकाम पूर्ण केले जाणार असल्याचा अंदाज आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. या बंधाºयामुळे सुमारे १०० हेक्टरपेक्षा जास्त जमिनीला सिंचनाची सोय होणार आहे.बंधाºयाला मंजूरी मिळवून दिल्याबद्दल पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, हुकूमचंद नागपूरे, चेतन नागपूरे, रतन लिल्हारे, गिरधारी बघेले, विजय लोणारे, गोपालबाबा खरकाटे, टिकाराम भाजीपाले, संजय अग्रवाल, दिनेश अग्रवाल, छून्नू खरकाटे, मोनू खरकाटे, सत्यम बहेकार, राजेंद्र भाजीपाले, संतोषसिंह घरसेले आदिंनी आमदार अग्रवाल यांचे आभार मानले आहे.
कोल्हापुरी बंधाºयाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 9:18 PM
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम पांजरा येथे कोल्हापूरी बंधाºयांच्या बांधकामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. यासाठी राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
ठळक मुद्दे३ कोटी ५० लाखांचा निधी : आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश