गोंदिया जिल्हात 8 तालुके आहेत, त्यातील 4 तालुकात मार्केट फेडरेशन तर 4 तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ धान खरेदी करते. हंगाम 2023-24 मध्ये आदिवासी विकास महामंडळाचे एकंदरीत 44 केंद्रा पैकी 41 खरेदी केंद्र सुरू झाले आहे. ही खरेदी प्रक्रिया सुरू असताना 50 हजार क्विंटल जवळपास धान खरेदी आज पर्यंत करण्यात आलेली आहे.
विशेष करून गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी विकास महामंडळ हे आदिवासी वितकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून एकंदरीत सर्व खरेदी केंद्रामध्ये धान खरेदी केल्या जाते. यामध्ये आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव केंद्र शासनाने जे ठरवून दिलेले आहे. त्या हमीभावा प्रमाणे खरेदी करता आला पाहिजे यासाठी शासनाने जे धोरणात्मक निर्णय केल्याप्रमाणे एकंदरीत खरेदी केंद्र मध्ये 40 किलो वजनाच्या कट्ट्यामध्ये खरेदी केल्या जातात आणि त्या पद्धतीने कुठलेही शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिळवणूक फसवणूक होऊ नये यासाठी महामंडळातर्फे सतत नियंत्रण केले जात आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण असल्यामुळे काही ठिकाणातील खरेदी केंन्द्र बंद करण्यात आले आहे. ह्या अवकाळी पावसामुळे ज्या ज्या ठिकाणी खरेदी केंद्र उघड्यावर आहेत, त्याच बंद करण्यात आल्या. असुन ज्या संस्थांचे गोदाम आहेत त्या संस्थेकडुन खरेदी प्रक्रिया सुरू आहे, जेणेकरून शेतकऱ्याला कुठेही अडचण येणार नाही. परंतु ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी संस्थेने खरेदी केलेली नसली तरी जवळपास 30 खरेदी केंद्र मध्ये खरेदी प्रक्रिया सुरू आहेत. आदिवासी विकास महामंडळचे संचालक यांनी शेतकऱ्यांला आवाहन केले की, आपण खरेदी केंद्रावर धान आणावा जेणेकरून त्यांची जी पेमेंटची व्यवस्था आहे ती ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यावर्षी ज्या संस्थेकडून खरेदी केले जात आहे, त्यामध्ये जसं जसं लाट पडत आहे त्या पद्धतीने मुख्यालय नाशिक मधून लगेच पेमेंटच्या व्यवस्था करण्यात येईल. यावर्षी कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांच्या पेमेंट मध्ये अडचणी होणार नाही याकडे सतत महामंडळाने लक्ष दिले आहे.