................
युवकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन १५ रोजी
गोंदिया : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदियाचे वतीने जिल्ह्यातील
युवकांकरिता ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन १५ जून रोजी दुपारी १२ वाजता घेण्यात येणार आहे.
‘एकविसाव्या शतकातील कौशल्य’ या विषयाबाबत मार्गदर्शन अधिव्याख्याता बालाजी जबडे हे करणार आहेत
.............
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी
गोंदिया : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया तसेच गोंदिया जिल्ह्यातील विविध योग संघटना यांच्या संयुक्त वतीने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सन २०२० मध्ये ज्याप्रमाणे कोविड अनुरुप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रमाणे सन २०२१ मध्येही केंद्र व राज्य शासनाच्या प्रचलित दिशानिर्देशांचे आधारीत २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, गोंदिया येथे आयोजित करण्यात येणार आहे. तरी योग संघटना, योगपटू व जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी कळविले आहे.