.................
गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद
जिल्ह्यात गुरुवारी (दि.१) ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे मागील दोन महिन्यातील सर्वाधिक तापमान होय. हवामान विभागाने सुध्दा विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर, ब्रम्हपुरी येथील तापमानात सुध्दा गुरुवारी वाढ झाली होती. वाढते तापमान लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
................
मागील आठवड्यात जिल्ह्यातील तापमान ३६ अंश सेल्सिअसच्यावर नव्हते. मात्र मागील दोन तीन दिवसांपासून तापमान वाढत असल्याने त्याच्या झळा सुध्दा नागरिकांना बसत आहे. तापमान वाढल्याने कुलर, पख्यांचा वापर सुध्दा वाढला आहे.
............
असा राहिल आठवडा
हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यातील तापमानात पुढील तीन चार दिवस वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार जिल्ह्यात २ ते ८ एप्रिल दरम्यान ४० ते ४१ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.
- ३ एप्रिलला ४१ अंश से., ४ एप्रिल ४१ अंश से. ५ एप्रिल ४० अंश से, ६ एप्रिल ४० अंश से. , ७ एप्रिल ४१ अंश से. आणि ८ एप्रिलला ४१ अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
..........